शहरातील वाहतूक कोंडी,उदय घोलप रस्त्यावर घातले लोटांगण

 शहरातील वाहतूक कोंडी,उदय घोलप रस्त्यावर घातले लोटांगण




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : २३ जुलै,


             शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा करणारे ह.भ.प उदय घोलप यांनी मंगळवारी शहरातील मुख्य रस्त्यावर अक्षरशा लोटांगण घातले.उदय घोलप यांनी नगरपंचायतीला पत्र देऊन वाहतूक कोंडी प्रश्न सोडवावा अन्यथा उपोषण करू असा लेखी इशारा दिला होता.परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने उदय घोलप त्यांची सहनशीलता संपली. मंगळवारी नातीला शाळेत सोडायला घेऊन जात असताना दहा मिनिटं वाहतूक कोंडीत अडकल्याने उदय घोलप यांनी तातडीने रस्त्यात लोटांगण घेत आंदोलन केले. 
                वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा क्षमा आठवले देखील त्या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी खालापूरकरांची कैफियत मांडली. शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे तातडीने खालापूर पोलीस नगरपंचायत अभियंता देवेंद्र मोरखंडीकर त्याठिकाणी आले. पोलिसांनी उदय घोलप यांची समजूत काढत अस्ताव्यस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करू असे आश्वासन दिले.
               नगरपंचायतीने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नेमलेला कर्मचारी जागेवर नसल्याने ही समस्या उद्भवत  असून कायमस्वरूपी तोडगा काढा अशी मागणी उदय घोलप यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर