चावणीच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष कटीबद्ध-राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे,चावणीत गाव भेट दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २४ जुलै,
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.जिल्हापरिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचे चावणी येथे जोरदार स्वागत करण्यांत आले.त्यांच्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला आहे, राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून प्रत्येक गावात जाऊन ते गोर गरिबांच्या अडचणी सोडवून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत,काल साजगाव पंचायत समिती मध्ये त्यांचा गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला असून सायंकाळी चावणी येथे या दौऱ्याची सांगता करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विधानसभेचे उमेदवार सुधाकर घारे यांचे फटाक्याच्या अतिशबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले,सुधाकर घारे यांनी त्यांच्या माध्यमातून चावणी ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून येणाऱ्या काळातही चावणीचा विकास करण्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांना सुधाकर घारे यांनी दिले.
चावणी गावाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी मोजक्या मावळ्यांना घेऊन शत्रूचा खानाचा मोठा पराभव करून उंबरखिंड येथे मोठा विजय मिळवला होता त्याचाच इतिहास या गावाला असून या पावन भूमीतुन आम्ही विधानसभेच्या प्रचाराची सुरुवात करत असून मला तुमचे मतदान रुपी आशीर्वाद द्यावे अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी चावणी ग्रामस्थांना केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रसचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, खालापूर तालूका अध्यक्ष संतोष बैलमारे, कर्जत तालूका अध्यक्ष अशोक भोपतराव, शेखर पिंगळे उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख,युवा नेते भूषण पाटील, भगवान चंचे, शरद कदम, चावणीचे उपसरपंच सुखदेव भोसले, ग्रामपंचायत सदस्या संगीता संदीप चिंचावडे,प्राची पांडुरंग पाटील, लक्ष्मण घुटे, जेष्ठ ग्रामस्थ बाळू बुधलेकर, परशुराम पाटील, माजी सरपंच हनुमंत पाटील, पांडुरंग पाटील, हरेश दयानंद पाटील, धोंडू चिंचावडे, दत्ता चिंचावडे, सुभाष भोसले, माजी सरपंच येनुबाई भोसले, सामाजिक आकाश चिंचवडे, सुझल पाटील, भास्कर खेरटकर, आकाश पाताडे, नरेश पाताडे, किशोर डफळ, सोमनाथ उतेकर, सखाराम बुधलेकर, यशवंत शिंदे, राकेश शिद, चेतन पाटील, सुभाष पाताडे, चंदर वाघमारे, कुणाल चिंचवडे, संदेश कोंडभर, अमोल चिंचावडे, मा.पोलीस पाटील जनार्धन पाटील, राजेश कोंडभर, संगेश फाटक, रामदास चिंचावडे, कल्पेश चिंचावडे, रोहिदास भोसले,आदिसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
0 Comments