लायन्स क्लब खालापूर नविन कार्यकारणी जाहिर,अपंग व्यक्तीस सायकल भेट

 लायन्स क्लब खालापूर नविन कार्यकारणी जाहिर,अपंग व्यक्तीस सायकल भेट,गुरुकुल महड येथे विद्यार्थ्यांना स्कुल बॅग व वह्या वाटप




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर ; २६ जुलै,

                लायन्स क्लब खालापूर हे विविध उपक्रम हाती घेत असतांना वर्षपुर्ती होताच नविन कार्यकारणी अष्टविनायक महड येथे जाहिर करण्यांत आली.या निमित्ताने आंबिवली येथिल अपंग व्यक्ती नामदेव बारकू जाधव यांस, किशोर नामदेव पाटील (माजगाव)यांच्या सुचनेने आणि लोकनियुक्त सरपंच दिपाली नरेश पाटील यांच्या प्रयत्नाने व रमेश जाधव व लायन्स -  मा.उप सरपंच राजेश पाटील,लायन्स  - रामचंद्र गायकवाड  यांच्या संकल्पनेतून ही सायकल देण्यांत आली.या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून मा.जिल्हा गव्हर्नर - राजेश प्रजापती यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.

            लिओ लायन्स क्लब खालापूर स्टार असा नवीन क्लब स्थापन करण्याचा संकल्प जाहीर केला,मागिल वर्षा या टिम ने उत्तम असे काम केल्यामुळे,नावलौकिख झाले होते.त्याच बरोबर नविन सभासद नियुक्ती करून शपथविधी देण्यांत आली.या निमित्ताने गुरुकुल महड येथे विद्यार्थ्यांना  स्कुल बॅग व वह्या वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून विद्यार्थी यांच्या अभंग गायन करून सुरवात करण्यांत आली.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन किशोर पाटील,आभार प्रदर्शन महेंद्र सावंत यांनी केलं.

           यावेळी झोन अध्यक्ष - अतिक खोत,- प्रदेश अध्यक्ष - सुयोग पेंडसे, जीएस टी अध्यक्ष - विजय गनात्र,जिल्हा अपंग अध्यक्ष - पंकज शर्मा, लायन्स क्लब खालापूर अध्यक्षा -  शिवानी जंगम,तसेच  २०२४  ते २०२५ या  वर्षी साठी नवीन कार्यकारिणी  जाहीर  करण्यात आली.खजिनदार किशोर पाटील,प्रथम उपाध्यक्ष लहू भोईर, द्वितीय उपाध्यक्ष - भरत पाटील,सचिव- रामचंद्र गायकवाड, सभासद - राजेश पाटील ,सह खजिनदार - मिनील खलापूरकर यांची पुन्हा एकदा फेर नेमणूक करण्यात आली.
        

 

 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर