रफिक कर्जीकर यांच्या घरी दुर्मिळ सारस पक्षी,उपचार सुरु असतांना सोडला अखेरचा श्वास
पाताळगंग न्युज : वृत्तसेवा
खोपोली : २८ जुलै,
ग्रामीण अथवा शहरी भागात पक्षी येण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.कारण सिमेंट च्या घरामुळे जंगले नष्ट होत चालली असतांना असाच एक दुर्मिळ पक्षी हाळ गावातील असलेले रफिक कर्जीकर यांच्या घराच्या छपरावर हा पक्षी आला,काही तास त्याच ठिकाणी असल्यामुळे मात्र तो अक्षक्त वाटत असल्यांने अपघातग्रस्तांचे गुरुनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क साधला,मात्र हा पक्षी दुर्मिळ असल्यामुळे प्राणी पक्षी सर्पमित्र योगेश शिंदे आणि सुकृत गोटस्कर यांनी तो दुर्मिळ असा सारस पक्षी असल्याचे सांगितले.
या पक्षांना अलगद पकडून सुरक्षित ठिकाणी ठेवून अन्न आणी पाण्यांची व्यवस्था करण्यांत आली. सारस पक्षी वरवर पाहता अशक्त दिसत असल्याने पक्षी मित्र आणि या क्षेत्रातील अभ्यासक अभिजीत घरत यांनी खास प्राणी पक्षावर इलाज करणाऱ्या रेस्क्यू संस्था - पुणे यांच्याशी संपर्क साधला. त्या संस्थेचे सदस्य हर्षद हे तातडीने या ठिकाणी हजर झाले.या दुर्मिळ सारस पक्षाला उपचारासाठी घेऊन जाण्याकरिता ॲम्बुलन्स या ठिकाणी आली.मात्र पशुवैद्य विष्णू काळे हे प्राथमिक उपचार सूरू केला.मात्र त्या दरम्यान दुर्दैवाने त्या पक्षाचा मृत्यू झाला.
सारस पक्षी अभ्यासक्रमा व्यतिरिक्त तसा कोणास परिचित नसल्यामुळे, त्या कारणे त्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली असल्यांचे पहावयांस मिळाले.बहुतेक हा पक्षी पुन्हा गगण भरारी घेईल,मात्र ही आशा फोल ठरली.मात्र या पक्षाला वाचविण्यासाठी घेतलेली सर्वांनी ती धडपड,पहातांना प्रत्येकाला मनाला छेदून जात होती.मात्र असा पक्षी आपण आपल्या आयुष्यात कधी पाहिला नसल्याचे येथिल उपस्थित वयवृद्ध मंडळी बोलत होते.
चौकट :
यांनी कर्जीकर कुटुंबीयांचे कौतुक करताना सांगितले की, हल्ली आपल्या दैनंदिन व्यवहारात वेळ काढून सारस पक्षाला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न भलेही असफल झाले असतील, मात्र भविष्यात असे दुर्मिळ पक्षी किंवा प्राणी दिसता क्षणी त्या बद्दलची माहिती त्यांचे संस्थेस दिल्यास त्याला नैसर्गिक अधिवास मिळवून देण्यासाठी त्यांची संस्था तातडीने निशुल्कपणे सहकार्य करण्यास तयार आहे.
रेस्क्यू टिम - हर्षद
चौकट
साधारणता चार ते पाच तास सारस पक्षाला वाचविण्यासाठी सुरू असलेले सर्वांचे प्रयत्न असफल झाले जरी असले तरी आजच्या घडीला मानवतेचे एक नवे उदाहरण म्हणून समोर आले आहे.
प्राणी आणि पक्षी मित्र - नवीन मोरे
चौकट
पुर्वजन्मीचे ऋणानुबंध असतील म्हणूनच तो सारस पक्षी आपल्या येथे आला आणि आमच्या हातून त्याची शेवटची का होईना त्याची सेवा घडली, हा योगायोग नव्हे तर अल्लाहचा आदेश असावा अश्या भावना रफिक कर्जीकर यांनी व्यक्त केल्या. याच गावातील गावकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी दुर्मीळ खवल्या मांजराला जीवदान दिले होते.
हाळ ग्रामस्थ - रफिक कर्जीकर
0 Comments