विठाबाई येरूणकर यांचे निधन
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा खोपोली : २० जुलै,
जिल्हा सत्र न्यायालयाचे शासकीय वकील अँड राजेंद्र येरूणकर यांच्या मातोश्री विठाबाई एकनाथ येरुणकर यांचे ८७ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. विठाबाई यांनी मानकिवली सारख्या ग्रामीण भागामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेती व्यवसाय मुलांचे संगोपन करून त्यांना स्वावलंबी बनवले. ज्येष्ठ चिरंजीव राजेंद्र येरूनकर हे जिल्हा सत्र न्यायालयात शासकीय वकील त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी कार्यरत आहेत. त्याच्या पश्चात तीन विवाहित मुले विवाहित कन्या, नातवंडे सुना असा मोठा परिवार आहे, खालापूर तालुक्यातील मानकिवली गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.
0 Comments