खालापूर पोलीस ठाणे चे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे यांना राष्ट्रपती पदकांने सन्मानित
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : १८ ऑगस्ट,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड मध्ये सेवा करायची संधी मिळाली असून एका शेतकऱ्याच्या मुलाला राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यापर्यंतचा प्रवास यामुळे खूप आनंदाचा क्षण आहे.अशी भावना यंदाचे राष्ट्रपतींचे पोलीस पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गोविंद जुंदरे यांनी व्यक्त केली.
खालापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गोविंद जुंदरे यांना पदक मिळाले असता.खालापूर ग्रामस्थ, पत्रकार यांच्या वतीने जुंदरे यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन खालापूर पोलीस ठाणे येथे करण्यात आले होते. जुंदरे यांच्या कार्याची ओळख श्रीकांत कोकणी सर यांनी प्रस्तावनेत करून दिली.तर खालापुरातील यशस्वी उद्योजक महेश राठी यांनी शिवाजी जुंदरे यांनी पोलीस खात्यात सेवा बजावत असताना केलेला थरारक कामगिरीची माहिती उपस्थित त्यांना देतात टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेक अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करण्याची अवघड कामगिरी पोलीस उपनिरीक्षक जुंदरे यांनी केल्याचे ऐकून उपस्थित अवाक झाले.
खालापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र शहा, उद्योजक महेश राठी,जेष्ठ नागरिक खालापूर पुंडलिक लोते,इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा क्षमा आठवले , रायगड जिल्हा मनसे महिला अध्यक्षा हेमलता चिंबूळकर, पत्रकार मनोज कळमकर,दिपक जगताप , विकी भालेराव , ग्रामस्थ लक्ष्मण जाधव,उमेश पडवकर साहिल सावंत ,योगेश जाधव, शिक्षक श्रीकांत कोकणी यांच्या उपस्थितीत जुंदरे यांचा शाल, श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक जुंदरे यांनी सत्कार प्रसंगी त्यांचा जीवन प्रवास सांगितला १९९० मध्ये नाशिक जिल्हयातील पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेले २०२३ मध्ये खात्यांर्गत परिक्षेतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्याचे सांगितले.
रायगड मधील माणस अतिशय प्रेमळ असून सत्काराच्या निमित्ताने प्रचिती आली असे जुंदरे यांनी सांगितले. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे ,खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम ,पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शना मुळे राष्ट्रपती पदकाचा बहुमान प्राप्त झाला असे जुंदरे यांनी सांगितले.
यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले. क्षमा आठवले यांच्या छोट्या नाती आणि नातू अगस्त्य व आद्या यांनी पर्यावरणावर अतिशय समर्पक असे गीत यावेळी गात उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. वृक्षारोपण प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास भोर, सहाय्यक फौजदार प्रकाश वाढवे, रवींद्र सोनवणे, सुभाष पाटील ,मोहन भालेराव, पोलीस नाईक नितीन शेडगे, निलेश कांबळे, हेमंत कोकाटे समीर पवार दिनेश भोईर, चंदा गायकवाड, किर्ती कांबळे आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments