ताराराणी ब्रिगेड कडून रक्षाबंधन निमित्ताने अनोखा उपक्रम

 ताराराणी ब्रिगेड कडून रक्षाबंधन निमित्ताने अनोखा उपक्रम, विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्याना राखी बांधून हेल्मेट वापरण्यासाठी दिली शपथ, खालापूर स्टेशन मधील पोलीस बांधवान सोबत ही केल रक्षाबंधन सण साजरा



पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : १८ ऑगस्ट,

           वाहनचालकांस रक्षाबंधन दिनानिमित्ताने सुरक्षाराखी बांधून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यांसाठी,तसेच पोलीस बांधव कर्तव्यदक्ष अधिकारी हे देखील सणाच्या दिवशी सुट्टी न घेता आपले कर्तव्य बजावत असतात.म्हणून ताराराणी ब्रिगेड कडून रक्षाबंधन निमित्ताने अनोखा उपक्रम यावर्षी सुद्धा राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आला. 

                  रक्षाबंधन हा पवित्र सण सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ताराराणी ब्रिगेड अध्यक्ष वंदनाताई मोरे या विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात, तसेच  सामाजिक कार्यात स्वतःला पूर्ण झोकून विविध कार्यक्रम राबवत असतात,दरवर्षी प्रमाणे  या वर्षी देखील वाहतूक शाखेचे नियम  न करणाऱ्या व नियम न पाळणाऱ्या दुचाकी,  वाहन चालकांना थांबवून त्यांना रक्षाबंधन दिनानिमित्त सुरक्षाराखी बांधून वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे असे सांगण्यात आले. 

               भाऊ बहिणीची रक्षा करण्याचे वचन  रक्षाबंधन दिवशी दिले जाते.सालाबादप्रमाणे ताराराणी ब्रिगेड मार्फत हा सण साजरा करण्यात आला, यावेळी सर्व पदाधिकारी महिलांनी राखी बांधली रक्षाबंधन निमित्ताने अनोखा उपक्रम,विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्याना राखी बांधून हेल्मेट वापरण्यासाठी दिली शपथ,खालापूर स्टेशन मधील पोलीस बांधवान सोबत ही केल रक्षाबंधन सण साजरा केला 
                यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आरोटे,पोलीस उपनिरीक्षक सरिता मनवर,पोलीस उपनिरीक्षक बाळा जाधव,सुभाष म्हात्रे, रतन बागुल, अमित सावंत, निलेश कांबळे,आशा पापलं व संगीता भगत यांच्या सोबत या कार्यक्रमासाठी ताराराणी ब्रिगेड च्या राष्ट्रीय अध्यक्षा शिवमती वंदनाताई मोरे, राष्ट्रीय उपाध्यक्षा शिवमती कविता खोपकर, रायगड जिल्हा अध्यक्षा शिवमती वर्षा मोरे, खालापूर तालुका अध्यक्षा शिवमती किशोरीताई चेऊलकर, खोपोली शहर उपअध्यक्षा शिवमती वर्षा वडजे, सचिव सुखदा बने, कार्याध्यक्षा मनीषा नरंगळे, सदस्या सुनंदा कोहोक उपस्थित होत्या.
           

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर