विद्यार्थ्यांनी चौक येथिल लोकमान्य टिळक वाचनालयांस भेट,ग्रंथालयांचा केला अभ्यास
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
चौक : १७ ऑगस्ट,
चौक ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहकारी सरनौबत नेताजी पालकर यांचे हे जन्म गाव म्हणून प्रसिध्द आहे.अशा या ऐतिहासकालीन असलेले चौक येथिल बाजारपेठेत लोकमान्य टिळक मोफत वाचनालय असल्यामुळे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चौक येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी या ग्रंथालयास भेट देऊन येथील कामकाज आणि पुस्तक वाचण्यांचा आनंद आणी अनुभव शेकडो विद्यार्थी घेतला.
९ ऑगस्ट १९२० रोजी स्थापना करण्यांत आलेल्या या ग्रंथालयांस शंभर वर्ष पूर्ण झाले असून,या ठिकाणी ५८१ हुन अधिक सभासद असून,पंधरा हजार सातशे अडत्तीस पुस्तके आहेत.या ठिकाणी नेहमी वाचक येत असून त्याच बरोबर या ठिकाणी नियमित विविध प्रकारचे १८ वर्तमान पत्रे येत असल्यामुळे या ठिकाणी वाचकांची सातत्याने रेलचेल असते.व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व असून ,शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, व ते भविष्यात भारताचे सक्षम नागरिक बनावेत या दुरदृष्टीकोनातून शालेय विद्यार्थ्यांना ग्रंथालयात बाल- कुमार वाचण्यासाठी व त्यांचा वयोगटात सुयोग्य असलेले ग्रंथ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यांत आले.सदर ग्रंथालयाचा इ. ब दर्जाचा असून पहिल्या मजल्यावरील सुरेश धरमचंद्र ओसवाल हॉल मध्ये स्पर्धा परिक्षा विभाग सुरु केला आहे.त्याच बरोबर सर्व सभासदांना इंटरनेट सेवा पुरविली जाते.
या ठिकाणी आलेल्या सर्व विद्यार्थ्यानी आपल्या आवडीनुसार विविध पुस्तके ग्रंथ वाचण्यांचा आनंद घेतला यावेळी विद्यार्थ्यांच्या चेह-यावर वेगळाच हावभाव पाहावयास मिळाले.या ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश वत्सराज,सेक्रेटरी - सतिष आंबवणे,विश्वस्त - रजनीकांत शाह,ग्रंथपाल - अभिजित चौधरी,कार्यकारणी सदस्या - रंजना साखरे,पुनम चोगले,डॉ. श्रीनिवास वाळिंबे, डॉ.अपर्णा वाळिंबे,अशोक चौधरी,राजेंद्र चौधरी,राजेश आंबावणे,मुरलीधर साखरे,अजिंक्य चौधरी,मनोज साखरे,ऐश्वर्या जोशी,काशिनाथ खंडागळे,ग्रंथालयांचे कर्मचारी,मुख्याध्यापक - नाईक सर,शिक्षका - आरती मॅडम प्रिया मॅडम यांच्या सहकार्यांने विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचण्यांचा आणी येथिल कामकाज चा आनंद घेतला.
चौकट :
या वर्षी ग्रंथालयाची शताब्दि वर्ष पुर्ण होवून १०४ वर्षात वाटचाल होत असुन विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले.या ग्रंथालयाची स्थापना ९ ऑगस्ट १९२० रोजी झाले असुन,आजगत ग्रंथालय सुस्थितीत उत्तम असुन ग्रंथालयाचे सभासद ५५० हून अधिक असून पुस्तके संख्या एकुन (पंधरा हजार सातशे अडत्तीस )आहे
( ग्रंथपाल : अभिजित चौधरी,लोकमान्य टिळक मोफत वाचनालय चौक )
0 Comments