रुपेश देशमुख यांचा प्रामाणिकपणा,पैशाने भरलेले पॉकेट प्रतिज्ञा खरात यांच्या कडे सुफुर्त
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : २ ऑगस्ट,
जग पैशाच्या मागे असते असे म्हणतात परंतु काही व्यक्ती हे समाज्या मध्ये आहे ते आपले ते आपले आणी दुस-यांचे ते दुस-यांचे,हेच तत्व मनाशी बाळगत आहे.खोपोली येथील समाज मंदिर रोड परिसरातील केक वॉक या दुकानाचे मालक रुपेश देशमुख यांना पैशाने भरलेले पॉकेट सापडले.या पॉकेटमध्ये त्यांना पैशाची मोठी रक्कम व काहीं कार्डस आढळून आलें.सबंधित पुर्ण खात्री करुन हे पॉकीट प्रतिज्ञा खरात त्यांच्या जवळ सुफुर्त करण्यांत आले.
रात्रीची वेळ सापडलेले पैश्यांचे पॉकीट केक शॉप हे दुकान बंद करायचे असल्याने त्यांनी सदर पाकीट हे आपल्या दुकानात ठेवून दिले.याची कल्पना त्यांनी त्यांचे मित्र कलेक्शनचे मालक समीर साठे यांना दिले.या दोघांनी संयुक्तपणे सहज सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांना या संदर्भात कल्पना दिली असता त्या पॉकेटमध्ये यश क्लासेसचे नाव आहे.असे समजल्याने डॉ. शेखर जांभळे यांनी यश क्लासेस चे मालक प्रवीण बागुल यांना संपर्क साधला त्यावेळी त्यांच्या सौभाग्यवती कांचन बागुल यांनी नुकताच त्या खोपोली पोलीस स्टेशनमध्ये असून संबंधित पॉकेट हरवण्याची तक्रार देण्यासाठी आलेले आहेत असे सांगितले.
परंतु पॉकेट रुपेश देशमुख यांच्या दुकानात आहे,आपण सकाळी खात्री करून घेऊन जाऊ शकता असे सांगितल्याने त्यांचाही जीव भांड्यात पडल. यश क्लासेस मध्ये कार्यरत असणाऱ्या प्रतिज्ञा खरात यांचे हे पॉकेट असल्याचे समजल्याने स्वतः संचालिका त्या ठिकाणी तक्रार देण्यासाठी खोपोली पोलीस स्टेशन मध्ये गेल्या होत्या.ओळख पटवून सदर पैशाचे पाकीट हे खोपोली शहरातील अविनाश किर्वे,डॉ.शेखर जांभळे,सचिन साठे,प्रकाश जाधव,समिर साठे,प्रवीण बागुल,कांचन बागुल यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे व सर्वांना मदतीचे हात देणारे रुपेश देशमुख हे तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेतच परंतु त्यांच्या या वेगळ्या रूपाने खोपोलीकरांना त्यांच्या प्रति आदर द्विगुणित झाला आहे.सदर पॉकेट परत केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून प्रामाणिकपणा जिवंत आहेत असे मत यावेळी पॉकेट हरवलेल्या प्रतिज्ञा खरात यांनी व्यक्त केले आहे.
0 Comments