पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आश्वासनानंतर होमगार्ड लक्ष्मण आखाडे यांचे आमरण पोषण स्थगित
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १६ ऑगस्ट,
खालापूर तालुक्यातील गारमाळ येथील लक्ष्मण आखाडे हे होमगार्ड ची कर्तव्य बजावत असताना अपघातात पाय निकामी झाल्यामुळे अपंगत्व आलेल्या होमगार्ड लक्ष्मण आखाडे यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी या मागणीसाठी १४ ऑगस्ट पासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते १५ ऑगस्ट रोजी महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उपोषण स्थळी जाऊन लक्ष्मण आखाडे यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपोषण स्थळी जात १६ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक लक्ष्मण आखाडे यांच्या मागणीबाबत बैठक बोलावून उपोषण स्थगित करण्याची विनंती केल्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक भरत फार्णे यांनी लेखी पत्र व शीतपेय देऊन उपोषण स्थगित करण्याचे विनंती केली
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण संतोष ठाकूर, ऑल इंडिया धनगर समाज महासंघांचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आणी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील उदय गावंड, मानसी पाटील,माजी अध्यक्ष रामचंद्र पुकळे, प्रभारी अध्यक्ष आनंदराव कचरे, डॉ राजाराम हुलवान, आदी मान्यवर उपस्थित होते.मात्र येत्या महिन्याभरात मागणी मान्य न झाल्यास पुन्हा आमरण उपोषणास बसण्याचा इशारा लक्ष्मण आखाडे यांनी दिला आहे
0 Comments