खोपोलीत सँम्युअल सिनेमागृहाचे आ. महेंद्र थोरवे याच्या हस्ते उद्घाटन

 खोपोलीत सँम्युअल सिनेमागृहाचे आ. महेंद्र थोरवे याच्या हस्ते उद्घाटन



 पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : १७ ऑगस्ट,

          खोपोली शहरात अत्याधुनिक चित्रपटगृह नसल्यामुळे रसिकांना वाशी, मुंबई सारख्या महानगरात जावं लागत आहे. प्रेक्षकांशी गरज ओळखून माजी उपनगराध्यक्ष बेबीशेठ सँम्युअल यांनी सँम्युअल सिनेमागृह उभारले आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर बेबीशेठ सँम्युअल यांनी उपस्थित जुन्या सहकारी मित्रांचा सन्मान करीत आपली यारी लय भारी असल्याचे दाखवून दिले आहे.
         खोपोली शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या पुणे जुन्या महामार्गालगतच सॅम्युअल इमारत उभारली आहे. या इमारतात सँम्युल सिनेमागृह चालू केले होते. आधुनिक काळातील प्रेक्षकांची गरज ओळखून दोन स्वतंत्र सिनेमागृह उभारले आहे .वेगवेगळ्या दोन थिएटरमध्ये १७० आणि ८० प्रेक्षक बसतील अशी असन व्यवस्था आहे. सिनेमागृहाचे आ.महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाले.
          यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर, डॉ.सुनील पाटील, माजी नगरसेवक मोहन औसरमल, किशोर पानसरे, महादू जाधव, राजू गायकवाड, राजू ठुमणे, शिवसेना संपर्कप्रमुख पंकज पाटील, शहर प्रमुख संदीप पाटील, तात्या रिठे, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अल्पेश थुरपुडे, महिला आघाडीच्या प्रिया जाधव, माधवी रिठे, मेघा वाडकर, व्ही.डी.एम.स्कूलचे चेअरमन उल्हासराव देशमुख, रिपाई नेते हिरामण निळे, ज्येष्ठ उद्योजक यशवंत साबळे, जगदीश जाखोटीया, विक्रम साबळे, लक्ष्मण रिठे, प्रसाद वाडकर, अनिल मिंडे, संतोष खुरपडे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
         खोपोली सारख्या छोट्या शहरात मनोरंजनासाठी साधने उपलब्ध नसताना बेबीशेठ सॅम्युअल यांनी अद्यावत दोन सिनेमा हॉलची निर्मिती करून येथील जनतेला मनोरंजनाची साधने उपलब्ध केल्याबद्दल आ.थोरवे यांनी कौतुक केले. या समारंभाला प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत रॉबिन सॅमयल, ईबिन सॅम्युअल, सुबिन स्यामुअल व माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल यांनी केले.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन