दहावी मध्ये उत्तम गुणांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सिप्ला फाउंडेशन कडून आर्थिकरुपी बक्षिसे

 दहावी मध्ये उत्तम गुणांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सिप्ला फाउंडेशन कडून आर्थिकरुपी बक्षिसे



पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
माजगांव  : ७ ऑगस्ट

              सिप्ला फाउंडेशन हे सातत्याने विद्यार्थ्यांसाठी आर्थिक तसेच शैक्षणिक शालेय साहित्य वाटप करीत असते.कोकण एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा माजगाव या शाळेमध्ये या वर्षी दहावी मध्ये उत्तम गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांस आर्थिक स्वरूपात बक्षिसे देण्यांत आली.यावेळी प्रथम क्रमांक १२,००० हजार रुपये,द्वितीय १०,००० हजार रुपये तसेच तृतीय ८,००० हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यांत आले.त्यास समवेत  विद्यार्थ्यांस प्रमाणपत्र देण्यांत आले.यावेळी आपण हे बक्षीस जिंकल्यामुळे त्यांच्या चेह-यांवर आनंदाचे हास्य झळकत असल्यांचे पाहावयास मिळाले.


                  प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी आणि आपण सुद्धा बक्षिसे मिळावे ही महत्वकांक्षा त्यांच्या मध्ये निर्माण व्हावी या उद्दात विचारांतून हा उपक्रम हाती घेतला असल्याचे सिप्ला फाउंडेशन उल्का धुरी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या हातामध्ये ही बक्षिसे रुपी आर्थिक रक्कम देतांना व्यक्त केले.यावेळी प्रथम .भुमिका प्रफुल कांबळे,द्वितीय,नफिस छोटू हुसेन,तृतीय -पूनम शंकर वाघे यांस देण्यांत आली.

             यावेळी सिप्ला फांऊडेशन पाताळगंगा सीएसआर - उल्का धुरी कार्यक्रमाचे अध्यक्षा मधुकर पांडे,दुबे सर,कोकण एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा माजगाव प्रभारी मुख्याध्यापक गौतम कांबळे,तसेच पालक वर्ग आणी विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार