कामगार आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर कोप्रान फार्मा कामगारांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

 कामगार आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर कोप्रान फार्मा कामगारांचे आंदोलन तात्पुरते स्थगित 

योग्य तोडगा न निघाल्यास पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसणार 



पाताळगंगा न्युज : किशोर साळुंखे 
खोपोली : ७ ऑगस्ट,

        खालापूर तालुक्यातील प्रसिध्द असणाऱ्या सावरोली गावातील  कोप्रान फार्मा लिमिटेड कंपनीत रखडलेला  करार व विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांनी ८ आॕगस्ट पासून आंदोलनाचा इशारा देताच पनवेल , खांदा काॕलनीचे कामगार  आयुक्त यांनी मध्यस्थी केल्याने  कोप्रान कामागारांचे अंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. 
            खालापूरातील कोप्रान फार्मा लिमिटेड या कंपनीत गेली दोन वर्ष झाली, वेतन वाढ करार होत नाही. तसेच कामगारांच्या काही महत्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत.वारंवार कंपनी प्रशासनाकडे विनंती करुन ही मागण्या मान्य होत नसाल्याने कामगारांनी कायदेशीर मार्गाने अंदोलनाचे हत्यार उपसून उपोषण करण्याचा चंग बांधताच कंपनी प्रशासनाने कामगारांना गौंजरण्याचा प्रयत्न केला. परंतू वरिल मागण्या मान्य पूर्ण झाल्या नाही तर ८ आॕगस्ट रोजी उपोषण करणारच असा ठाम निर्धार ठेवल्याने सदर प्रकरण पनवेलच्या कामगार आयुक्तांसमोर गेले.
             आज दि. ७ आॕगष्ट रोजी कामगार आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत कंपनी प्रशासन व कामगार प्रतिनिधी यांची चर्चा होवून कंपनीच्या प्रांगणात दिनांक ९ आॕगस्ट रोजी कंपनी प्रतिनिधी व कंपनी प्रशासनाने योग्य तो मार्ग  निवडून कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात जो निर्णय होईल तो आयुक्तांना कळवायचा आहे.दि. ९ ऑगस्ट रोजी कामगारांच्या मागण्या मान्य न  झाल्यास पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा ईशारा आंदोलन कर्त्यांनी दिला  आहे.

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार