खोपोली खालापूर संघर्ष समितीतर्फे खोपोलीचे मुख्याधिकारी व उप मुख्याधिकारी यांचा सन्मान...
खत प्रकल्प स्थलांतरित निर्णयामुळे खोपोली खालापूर संघर्ष समिती नागरिकांनी मानले आभार
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खोपोली : ८ ऑगस्ट,
खोपोली नगरपरिषद मंडई मार्केट येथे असणारा खत प्रकल्पामुळे दुर्गंधीचा त्रास सर्व नागरिकांना होत होता.सदर प्रकल्प या ठिकानाहून स्थलांतरित करण्याची मागणी २३ जुलै रोजी खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली होती. मात्र मागणीवर विचार होत नसल्याने समितीच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी बेमुदत आंदोलन करण्याची भूमिका घेणार असल्यांचे संबंधित प्रशासनास पत्र देण्यात आले.या अनुषंगाने खोपोली नगर परिषदेचे सदर प्रकल्प बंदकरण्यांत आला. व लवकर स्थलांतरित करण्याचे पत्राद्वारे कळवल्याने बेमुदत उपोषण रद्द करण्यात आले.
शहरवासीयांच्या भावनांचा आदर केल्याने खोपोली खालापूर संघर्ष समितीतर्फे दिनांक ८ ऑगस्ट खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील व उप मुख्याधिकारी यांचा सन्मान पत्र देवून सन्मान करण्यात आला.यावेळी खोपोलीतील बहुसंख्य रिक्षा चालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्केटमधील रोडवर येणारा कचरा व शहरांमधील घंटागाडी संदर्भात असलेल्या समस्या प्रशासनाने सोडवाव्यात यासाठी खोपोली खालापूर संघर्ष समिती च्या वतीने आग्रही भूमिका मांडण्यात आली यावर मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी काही दिवसात यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.स्वच्छतेची ही लढाई आपण आपल्या परीने सुरूच ठेवूया.नागरिकांचे मार्गदर्शन व शुभेच्छा नक्कीच प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन उबेद पटेल यांनी केले आहे.
स्वच्छ खोपोली,सुंदर खोपोली या ब्रीदवाक्य नुसार खोपोली खालापूर संघर्ष समिती आरोग्याच्या समस्येकडे लक्ष देवून पाठपुरावा करीत असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहेत.
चौकट :
सदर खत प्रकल्पामुळे रिक्षा चालक - मालक व नागरिकांना प्रचंड त्रास होत होता.प्रशासनाच्या या निर्णयाने नक्कीच आम्हाला दुर्गंधीतून मुक्ती मिळेल.
रिक्षा संघटनेचे अविनाश पाटील
0 Comments