माजगांव येथिल अंगणवाडी निवारा शेड नसल्यामुळे,लहान मुलांची गैरसोय,ग्रूप ग्राम पंचायत चे दुर्लक्ष्य
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
माजगांव : ८ ऑगस्ट
ग्रूप ग्राम पंचायत माजगांव येथिल राजिप शाळेजवळ असलेली अंगणवाडी समोर निवारा शेड नसल्यामुळे पावसाचे पाणी अंगणवाडीत येत असल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत असल्यांचे पहावयांस मिळत आहे.पाऊस आल्यामुळे येथिल कर्मचारी यांची तारांबळ उडत आहे.शासनांने लहान मुलांच्या वरती चांगले संस्कार घडावे या साठी गावोगावी अंगणवाडी आहे.मात्र या ठिकाणी खिडकी तसेच लहान मुलांचे स्वच्छालय नादुरुस्त असल्यामुळे नाहक त्रास लहान मुलांना सहन करावा लागत आहे.
मात्र ह्या अंगणवाडीचे शुशोभिकरण उत्तम प्रकारे झाले असले तरी सुद्धा,अनेक समस्यांनी या अंगणवाडीला घेराव घेतला आहे.विषेश म्हणजे ग्रूप ग्राम पंचायत या कडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष्य करीत असल्यांचे येथिल स्थानिक बोलत आहे.लहान मुलांना अंगणवाडीत चांगले संस्कार मिळत असले तरी सुद्धा या ठिकाणी विविध समस्या निर्माण होत असल्यामुळे या कडे कोण लक्ष्य देणार असा सवाल उपस्थित होत आहे.
अंगणवाडीची समस्या विचारात घेत येथिल सामजिक कार्यकर्ते यांनी भोंगळ कारभार विषयी तिव्र नाराजी व्यक्त आहे.ज्या भावी पिढिच्या हातात समाज्यांची जबाबदारी घेणा-यांची ही अवस्था असेल तर आपण उत्तम शिक्षण घेवून काय उपयोग,मात्र याच ठिकाणी ग्रूप ग्राम पंचायत कार्यालय असून या कडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष्य केले जात आहे.
चौकट
एक ते तीन वर्षांची लहान मुले या माजगांव येथिल अंगणवाडीत येत आहे.सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे,हे पाणी आत मध्ये येत असल्यामुळे लहान मुलांची बसण्यांची गैर सोय होत आहे.त्याच बरोबर विविध समस्या या ठिकाणी असून ग्रूप ग्राम पंचायत जाणीव पुर्वक दुर्लक्ष्य करीत आहे.
सामाजिक कार्यकर्ते माजगांव - सचिन काठावले
.
0 Comments