राजिप शाळा कारगाव शैक्षणिक साहित्य वाटप ,तुकसई ग्रामस्थ यांची आरोग्य तपासणी,एटीजी सामजिक संस्थेचा पुढाकार

 राजिप शाळा कारगाव शैक्षणिक साहित्य वाटप ,तुकसई ग्रामस्थ यांची आरोग्य तपासणी,एटीजी सामजिक संस्थेचा  पुढाकार 




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
तुकसई / कारगाव  १ सप्टेंबर 

        शाळेय शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये,तसेच पालकांचा मुलावरील शिक्षणांचा खर्च कमी व्हावे या उदांत विचारांतून रायगड जिल्हा परिषद शाळा कारगाव येथिल विद्यार्थ्यांस दप्तर तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यांत आले.त्याच बरोबर तुकसई येथिल ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यांत आली.यावेळी मोफत औषधे देण्यांत आले.हे दोन्ही उपक्रम एटीजी सामजिक संस्था,बिलियन हार्ट बिटटींग,अपोलो हॉस्पिटल यांच्या सहकार्याने डॉ.विश्वासराव गिरी,अश्विनी गिरी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम हाती घेण्यांत आले.


         गेली अनेक वर्ष विविध उपक्रम राबवित असतांना सामाजिक बांधिलकी जोपासण्यांचे काम ही संस्था करीत आहे.त्याच बरोबर दिवसेंदिवस  विविध शारिरिक व्याधी निर्माण होत असते.मात्र जिथे घरचे भागविणे कठीण जात असतांना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष्य केले जात असते.मात्र हा अजार मोठा होवू नये यासाठी आरोग्य तपासणी करण्यांत आली.यावेळी ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद पहावयांस मिळाला.

            विद्यार्थी आणी ग्रामस्थ यांना केलेले सहकार्यामुळे या सामजिक संस्थेचा ग्रामस्थांकडून कौतुक करण्यांत आले.आपण प्रत्येक वेळी सहकार्य करण्यांस तयारी डॉ.गिरी यांनी दर्शवली.यावेळी अपोलो चे सहकारी,परेश सर,राजिप शाळा कारगाव मुख्याध्यापक - राजेंद्र दुर्गे,तुकसई ग्रामस्थ म्हणून सुनिल सर,रोहित पाटील उपस्थित होते. 


            




Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर