आमदार महेश बालदि यांचा तळवली गावात विकास कामाचा झंजावात
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
तळवली : २९ सप्टेंबर,
उरण मतदार संघाचे चे आमदार महेश बालदि यांनी गावच्या विकास कामासाठी स्वताला झोकून दिले आहे.गाव तिथे विकास हाच धोरण मनाशी बाळगून, विकास कामाचा झंजावात निर्माण केला आहे. तळवली येथिल संदेश काशीनाथ मालकर - ( बूथ अध्यक्ष - भाजपा यांच्या प्रयत्न आणी आमदार यांच्या योगदान यामुळे तलवली गाव ते अदिवासी वाडी पर्यंत रस्ता,स्मशानभूमी निवारा शेड असे दोन काम पुर्ण झाली आहेत.
त्याच बरोबर रायगड जिल्हा परिषद शाळा तलवली,या रस्त्यांचे कॉक्रेटिकरण करण तसेच हिंदुचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक चे काम सुरु आहे.गणेश घाट च्या शेजारी सरंक्षण भींत चे काम लवकरच सुरु होणार असल्यांचे भाजप कार्यकर्ते यांनी सांगितले.
गावाचा विकास करण्यांसाठी राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस सुरेश पाटिल, मा. सरपंच - ज्ञानेश्वर मालकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे महिला वर्गांस मुबलक पाणी मिळावे यासाठी हर घर नल, हर घर जल ही योजना आमदार यांच्या पाठपुरावामुळे ७ कोटि ९५ लाख ची योजना वडगाव गृप ग्राम पंचायत मधे प्रगतिपथावर असल्यांचे समजते.
गेल्या ५ वर्षात विविध विकास कामे करुन जनसामन्यात प्रश्न मार्गी लावल्यामुळे या निवडणूकीत आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आहोत असे संदेश मालकर - ( बूथ अध्यक्ष - भाजपा , तलवली चिटणीस - भाजपा युवा मोर्चा खालापुर तालुका,समीर मालकर , संजय मालकर,सतीश मालकर,रूपेश मालकर , महेन्द्र मालकर,गणेश मालकर,महादेव मालकर,संदीप मालकर,रोशन मालकर,नरेंद्र मालकर,कल्पेश मालकर ,वैभव मालकर,तानाजी मालकर,प्रणय मालकर,मयूर मालकर,प्रसाद बड़ेकर, यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
0 Comments