रामेती येथे किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन

 रामेती येथे किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन 




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : २७ सप्टेंबर,

          औद्योगिक करणामुळे शेती कमी झाली असून त्याच बरोबर शेतीचे विभाजन होवून तुकड्यामध्ये रुपांतर झाली आहे.मात्र या मध्ये भात शेतीच्या समवेत विविध पिके घेण्यांची ज्ञान विकसित व्हावे तसेच शेतीचे क्षेत्र वाढावे यासाठी रामेती खोपोली येथे तालुका कृषी अधिकारी खालापूर कार्यालयामार्फत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकऱ्यांकरिता किसान गोष्टी कार्यक्रम आयोजित करण्यांत आले.यावेळी शेकडो शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.


          यावेळी ढोकशेत, सुधागड पाली येथील शेतकरी सचिन टेके यांनी बांबूचे प्रकार,लागवड व व्यवस्थापन या विषयी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.प्रादेशिक संशोधन केंद्र कर्जत येथील शास्त्रज्ञ डॉ.विजय दामोदर यांनी आंबा लागवड व व्यवस्थापन या विषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली नितीन फुलसुंदर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांबरोबर संवाद साधून त्यांना असलेल्या प्रश्नांचे व शंकेचे निरसन केले.प्रभारी कृषी अधिकारी खालापूर एन.डी.गोसावी यांनी भात व आंबा पिक विमा, पी.एम.किसान, गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.अदि अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.त्याच बरोबर टाटा स्टील यांच्यामार्फत उपस्थित शेतकऱ्यांना गमबुट वाटप करण्यांत आले.  


         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी खालापूर सुनील निंबाळकर यांनी केले.आत्मा बी.टी.एम. प्रज्ञा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.त्याच बरोबर प्रभारी मंडळ कृषी अधिकारी खालापूर नितीन महाडिक,कृषि पर्यवेक्षक खालापूर उघडा सर कार्यक्रमास उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी ज्ञानेश्वर महादू पाटील, प्रशांत खांडेकर,बाळकृष्ण वाघमारे,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील,तालुका कृषी अधिकारी खालापूर कार्यालयातील अधिकारी व कनिष्ठ लिपिक एस.आर.वलेकर,कृषी सहाय्यक आर.बी.आंधळे, एन एस रांजूण, सी.आर.सारंग, पी.पी कदम, कृषी सेवक एस.एस.भगत, ए.एस.जाधव, ए.डी. देवकर,ए.ए.तोडकर, युनिट हेड-  टाटा स्टील -भावेश रावल,कुशल ठाकूर- टाटा स्टील,- क्षेत्रीय समन्वयक-  टाटा स्टील फाउंडेशन-उदय गावंड अदि उपस्थित होते.






 

Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव