धारणी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला ठाकरे गट शिवसेनेत पक्षप्रवेश

 धारणी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला ठाकरे गट शिवसेनेत पक्षप्रवेश 


पाताळगंगा न्युज : समाधान दिसले 
खालापूर : १ ऑक्टोबर,

          खालापुर तालुक्यातील चौक परिसरात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आसरे ग्रामपंचायत हद्दीतील धारणी येथील भाजपमधील कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोहर भोईर या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.तर हा पक्षप्रवेश सोहळा चौक मध्ये पार पडल्याने उरण विधानसभा मतदारसंघात भाजपला उतरती काळा येऊ लागल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पहावयास मिळत आहे.
                मयूर पिंगळे, नंदू दुर्गे, प्रमोद पिंगळे, रोशन तवले, चेतन मोरे, चेतन जाधव, करण दुर्गे आदी कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात भाजपाला रामराम ठोकून पक्ष प्रवेश केला असून हा पक्षप्रवेश सोहळा विभागप्रमुख गोरख रसाल व मा. उपसरपंच हरेश दुर्गे यांच्या पुढाकाराखाली पार पडला.
              उरण विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या आमदाराकडून विविध अमीषे दाखवण्यात येत असताना येथील जनता त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडत नसून अनेक जण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत शिवबंधन हाती बांधत असताना धारणी येथील तरुणांनी भाजपच्या मनमानी कारभाराला कंटाळून ठाकरे गट शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. 
              तर यावेळी जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, प्रवक्ते संतोष खांडेकर, माजी.जि.प. सदस्य मोतीराम ठोंबरे, उत्तम भोईर, सुनील थोरवे, राजेश पाटील, एम.के.गडगे, गोरख रसाळ, अनिकेत निकम, तेजस पाटील, प्रकाश जाधव, निखिल मालुसरे, बळीराम जांभळे, निखिल पाटील, मनोहर देशमुख, हरेश दुर्गे, दत्ता महाराज शिंदे, कृष्णा पाटील, बाळाराम ठोंबरे, भारती लोते, कृपाली मालकर, स्वाती जाधव, प्रशांत दुर्गे, अशोक पिंगळे, मनीष साबळे, संदेश दुर्गे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

एक्झॉमोबिल कंपनी कडून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप