मुख्यमंत्री योजनेचा निर्णय क्रांतीकारीक ,आमदार : महेंद्र थोरवे

 शिवसेना खालापूर तालुका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संपर्क अभियान आढावा बैठक संपन्न 


(आचारसंहिता जाहीर होताच शिवसेनेच्या मोर्चेबांधणीला सुरूवात)

(आमदार महेंद्र थोरवे यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी युवासेना, शिवसेना,महिला,युवती संघटनांचे मेळावे सुरू)

मुख्यमंत्री योजनेचा निर्णय क्रांतीकारीक ,आमदार : महेंद्र थोरवे 

पाताळगंगा न्युज : हनुमंत मोरे 
खोपोली : १७ ऑक्टोबर,





             कर्जत विधानसभा मतदारसंघाला मुख्यमंत्र्यांनी सदैव झुकते माप दिले असून जवळपास २९०० शे कोटी रूपयांचा विकास निधी आपणास विकास कामांसाठी दिला आहे.महिला सर्व क्षेत्रामध्ये पुढे याव्यात यासाठी त्यांना लाभ मिळावा हा उद्देश मुख्यमंत्र्यांचा आहे.मुख्यमंत्र्यांनी आज पर्यंत अनेक  योजनेचा निर्णय क्रांतीकारी पध्दतीने घेतला गेला आहे.असे गौरउद्दगार आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेना खालापूर तालुका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संपर्क अभियान आढावा बैठक व शिवसैनिकांचा भव्य मेळावा हॉटेल अंकल येथे सभागृहात  घेण्यांत आला यावेळी ते म्हणाले. 
            यावेळी व्यासपिठावर आमदार महेंद्र थोरवे,विजय पाटील, संतोष भोईर, संदेश पाटील, रोहित विचारे,हनुमान पिंगळे, निवृत्ती पिंगळे,एच.आर.पाटील,पंकज पाटील,मोहन औसरमल, विश्वनाथ पाटील,संजय देशमुख,उत्तम परबलकर, देविदास पाटील,राजू(उदय)शहासने,तात्या रिठे,हरेश काळे,रोशना मोडले,निलम चोरगे,रेश्मा आंग्रे,प्रिया जाधव,माधवी रिठे,कांचन जाधव,शितल ढोकले,संध्या जाधव आदी अन्य मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी ते पुढे म्हणाले की प्रत्येक महिलेला सक्षम करण्यासाठी घेतलेले निर्णय,शासनांच्या वतीने राबविलेल्या योजनांची माहिती व्हावी यासाठी ठिकठिकाणी शिबीराच्या माध्यमातून माहिती देत जनजागृती केली पाहिजे,प्रत्येक क्ष्रेत्रामध्ये महिला पुढे याव्यात यासाठी आपण शासनाच्या योजनेची माहिती गाव खेड्यात राहणाऱ्या बहिणींपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
            कर्जत विधानसभा मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी जवळपास दोन हजार ९०० कोटी रूपयांचा विकास निधी दिला आहे.मग यामध्ये खोपोली शहर,कर्जत शहर,माथेरान, खालापूर,मतदार संघातील जिल्हा परिषद विभाग अश्या सर्वच ठिकाणी अनेक विकास कामे झाली आहेत.आणि काही कामे लवकरच पूर्णत्वास जातील अश्या परिस्थितीत आहेत.कर्जत विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक विकास कामे झाल्याचा मला सार्थ अभिमान आहे.२०१९ मध्ये निवडणुकित भगवा फडकला आता तोच भगवा पुन्हा फडकावयाचा आहे.
                तुमच्या रूपाने सर्व शिवसैनिक माझ्या पाठिशी आहे तो पर्यंत हा भगवा झेंडा फडकत राहणार याची मला पूर्ण खात्री आहे.विधान सभेच्या निवडणूकीत विजय मिळविण्यासाठी आपली वज्रमुठ बळकट करा.प्रामणिकपणे काम करा,नारी शक्तीला बल द्या.महिलांचा सन्मान ही शिवसैनिकांची शिकवण आहे असे आपल्या भाषणांत मनोगत व्यक्त केले. 

_____ शिवसेनेत पक्ष प्रवेशासाठी गर्दी ---
यावेळी खालापूर तालुक्यातील अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला तसेच खोपोली शहरातील कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेची ताकद वाढविण्याचे काम केला.त्याच प्रमाणे मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेना बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

___ कोट---
अनेक योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसह जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राबविण्याचे धाडसत्र सुरू केले आहे.मात्र विरोधकांनी अफवा पसरविण्याचे सत्र सुरू झाले आहे.विरोधकांमध्ये हिम्मत असेल तर एका व्यासपीठावर येऊन विकास कामांवर चर्चा करा.हे करण्याची विरोधकांमध्ये हिम्मत नसल्याने कुठेतरी बसून नको ती चर्चा करणाऱ्यांची जेथे तेथे नाचक्की होत आहे.असो आपणास येणाऱ्या चाळीस दिवसात घरोघरी जाऊन शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा प्रचार करून आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांना पन्नास हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने निवडून आणायचे आहे.
___ संतोष भोईर 
शिवसेना उत्तर रायगड जिल्हाप्रमुख 

_____ कोट---
मुख्यमंत्र्यांनी आपले हात बळकट करण्यासाठी अनेक योजना सक्षमपणे राबविल्या आहेत.आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून संपर्क अभियान राबवून महिलांना मिळत असलेली मदत समजावून सांगण्याची गरज आहे.हे काम आजच्या संपर्क अभियानाच्या माध्यमातून करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत.आम्हा महिलांना मान, सन्मान मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून येथील आमदार महेंद्र थोरवे यांना भरघोस मतांनी निवडून देत करणार आहोत.
____ शितल ढोकले
महिला संघटीका

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन