राजिप, खाजगी व नगरपालिका शाळांची शिक्षण परिषद
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
वावोशी : १८ ऑक्टोबर,
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती शिक्षण विभाग खालापूर च्या वतीने खाजगी माध्यमिक अनुदानित व नगरपालिका माध्यमिक शाळांच्या शिक्षकांची शिक्षण परिषद श्री छत्रपती विद्यालय व वावोशी येथे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती खालापूर कैलास चोरामले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यावेळी १५० हून अधिक शिक्षक उपस्थित होते.
शासनाच्या NEP-2020 मधील बदललेल्या मूल्यमापन पद्धतीचे व अध्ययन कसे असावे याविषयी व शाळेच्या बदललेल्या मूल्यमापन पद्धती विषयी सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले.शिक्षकांनी बदलत्या काळानुसार स्वतःला बदलणे ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती खालापूर शिल्पा दास यांनी केले.
या कार्यक्रमास मार्गदर्शक मोहन दहिफळे यांनी अध्ययन निष्पत्ती,यावरती मार्गदर्शन केले.शाळेची पार्श्वभूमी,प्रस्तावना,गरज व उद्दिष्टे तसेच गुणवत्तापूर्ण मूल्यमापणासाठी प्रश्न निर्मिती असे अनेक मुद्यावर मार्गदर्शन मुख्याध्यापक प्राथमिक शाळा वडगाव - सुभाष राठोड,यांनी केले.भूषण पिंगळे यांनी मूल्यमापनाची साधन तंत्रे व रवींद्र घोगरे यांनी अभिलेखे व एच.पी.सी. याविषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडव यांनी केले.आभार प्रदर्शन मुख्याध्यापक जनता विद्यालय खोपोली - राजेंद्र म्हात्रे यांनी मानले.श्री छत्रपती विद्यालय वावोशी चे मुख्याध्यापक गावित सर,तसेच बहुसंख्येने शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते.
0 Comments