आर.पी.आय.(आठवले) गट उरण विधानसभा खालापूर तालुका अध्यक्ष पदि सुर्यकांत विठ्ठल कांबळे यांची नियुक्ती

 आर.पी.आय.(आठवले) गट उरण विधानसभा खालापूर तालुका अध्यक्ष पदि सुर्यकांत विठ्ठल कांबळे यांची नियुक्ती 





पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
माजगांव : २२ ऑक्टोबर,

                   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
राष्ट्रीय अध्यक्ष तथा मा. ना. केंद्रीय सामा.न्याय,राज्यमंत्री रामदासजी आठवले तथा जिल्हाध्यक्ष- रायगड नरेंद्र गायकवाड यांच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघाच्या "खालापूर तालुका अध्यक्षपदी एस.के कांबळे (सुर्यकांत विठ्ठल कांबळे ) यांची नियुक्ती करण्यांत आली.यावेळी त्यास नियुक्ती पत्र देण्यांत आले.
             एस.के.कांबळे यांस उरण विधानसभा खालापूर तालुका अध्यक्ष पदि नियुक्ती होताच कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष करण्यांत आला.कांबळे हे सातत्याने राजकीय,सामाजिक,धार्मिक क्षेत्रामध्ये सातत्याने सक्रिय असून त्यांच्या वर टाकलेली ही जबाबदारी उत्तम असल्यांचे बोलले जात आहे.आपली संघटना मजबूत करण्यासाठी आणी सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी त्यांची या पदावर वर्मी लागली असल्यांचे बोलले जात आहे.
           गेले अनेक वर्ष ते राजकारणात सक्रिय असून ते जनसामान्यात सुख दुखात सातत्याने खंबीर पणे उभे असतात.विशेष म्हणजे त्यांच्या कडे कोणताही भेद भाव नसून एक तरुण तडपदार व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.त्यांच्या कामाची तळमळ आणी समाज्याकडे पाहण्यांचा दृष्टिकोन या माध्यामातून त्यास हे नियुक्ती पत्र देण्यांत आले.
                यावेळी  महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य - सुमित मोरे, युवक कोकण प्रदेशाध्यक्ष - सुशांत सकपाळ,रायगड जिल्हा आरपीआय अध्यक्ष (आठवले) भाई नरेंद्र गायकवाड ,पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष - प्रभाकर कांबळे,रायगड जिल्हा कार्याध्यक्ष - अविनाश कांबळे ,रायगड जिल्हा सचिव - अशोक निकम,रायगड जिल्हा सरचिटणीस - सुनील सोनवणे, कर्जत शहर अध्यक्ष अरविंद मोरे,खालापूर तालुका संपर्क प्रमुख - संदीप गायकवाड,साजगाव विभाग प्रमुख- विनोद गायकवाड,आर. पी.आय खोपोली कार्यकर्ते - दिनेश गायकवाड, रायगड जिल्हा उपाध्यक्ष - जयेश शिंदे,पनवेल युवक अध्यक्ष - अजित शिंदे,आरपीआय कार्यकर्ते - विक्रम शेट्टे समवेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 


Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन