उल्हास भुर्के यांचा शिवसेनेत प्रवेश, सह संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती

 उल्हास भुर्के यांचा शिवसेनेत प्रवेश, सह संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती 



पाताळगंगा न्युज : हनुमंत मोरे
खोपोली /वावोशी : २१ ऑक्टोबर,

           शिवसैनिकांनी गाफील राहू नये, कोणत्याही परिस्थितीत कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकविणारच असा विश्वास व्यक्त करीत आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या मान्यवरांचे स्वागत केले.खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते उल्हास भुर्के यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.उल्हास भुर्के यांना शिवसेनेत मानसन्मान देण्यासाठी त्यांची शिवसेना सह संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले.
               निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना पक्षातील पक्ष प्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांचे मानसिक बल वाढविणारे ठरत आहे.शिवसेनेच्या वतीने पुढील निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवे हे येत्या २९ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलले,आपण पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे असे सांगत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत होत असलेल्या पक्षप्रवेशाने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
              खालापूर तालुक्यातील उल्हास भुर्के हे एक खंदे नेतृत्व असून आज पासून त्यांनी शिवसेनेचा धनुष्य हाती घेतल्यामुळे आपली ताकद नक्कीच वाढली आहे.त्यांचा प्रवेश म्हणजे शिवसेनेच्या विजयाची नांदीच असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments

लेकलँण्ड केमिकल्स कंपनीत स्थानिकांना कायमस्वरुपी कामावर घ्या - माडप आदिवासी, ठाकूरवाडीतील तरूणांची मागणी