राष्ट्रवादी ने सुधाकर घारे यांचे तिकिट नाकारले,पत्रकार परिषद घेत अपक्ष निवडणूक लढवणार केला निर्धार,सामुहिक दिले राजीनामा
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
कर्जत : २३ ऑक्टोबर,
कर्जत विधान सभेचे निवडणूक अति प्रतिष्ठेची मानली जात असतांना सुधाकर घारे यांस पक्षाकडून कडुन टिकीट मिळेल आशी आशा होती.मात्र ती फोल ठरली यामुळे येणा-या निवडणूकीत आपण रिंगणात उतरायचे हे मनाशी धोरण बांधून आणी कार्यकर्ते मतदान राजा यांच्या विश्वासावर अपक्ष लढविण्यांची भुमिका आज कर्जत येथे पत्रकार परिषद घेवून आपला मानस व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भरत भाई भगत, अशोक भोपतराव, भगवान चंचे, संतोष बैलमारे, अशोक सावंत, अंकित साखरे, भूषण पाटील, भगवान भोईर, दीपक श्रीखंडे, मनीष यादव, सुरेखा खेडकर, रंजना ताई धुळे, वैशाली ताई जाधव, प्रकाश पालकर, स्वप्नील पालकर, सर्फराज तिवाले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. घारे यांनी अपक्ष निवडणूक लढणार असं जाहीर करताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
कर्जत- खालापूर शिवसेना शिंदे गटातून विद्यमान आमदार महेंद्र थोरवे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून नितिन सावंत विधानसभेच्या रिंगणात उभे आहेत.मात्र आपणांस पक्षा कडून तिकिट नाकारले असतांना आपण ही निवडणूक लढविणार असल्यांचे त्यांनी सांगितले.येणा-या निवडणूकीत भरघोष मतांनी निवडून येणार असल्यांचे भाकित यावेळी सुधाकर घारे यांनी व्यक्त केला.यावेळी कार्यकर्ते यांचा उत्साह पहावयांस मिळाले.
पक्षाने तिकिट नाकारल्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षाला राजिनामा देत आहे.कारण आम्ही अपक्ष राहून दोन्ही उमेद्वार यांचा परभव करु यासाठी आम्ही पक्षातून बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवणार आहे तसेच आम्ही वरिष्ठ नेत्यास काही सांगितले नाही.मात्र पक्षाकडून आम्हास महायुतीचे काम करण्यांस सांगितले मात्र आम्हास मान्य नसल्यांचे सुधाकर घारे पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले.यामुळे येणा-या निवडणूकीत विजय आमचाच होणार हे मात्र निश्चित.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुधाकर घारे यांना जाहीर पाठींबा दर्शवला. त्याचप्रमाणे सुधाकर घारे यांच्यासह कर्जत खालापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा सामुहिक राजीनामा दिल्याचेही जाहीर केले.
आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये अनेक दिवस अनेक वर्ष काम करत होतो. परंतु आता आम्हाला ही निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधून बाहेर पडावं लागणार आहे, असं सुधाकर घारे यांनी पक्षाचा राजीनामा देतांना स्पष्ट केले.
0 Comments