राजिप शाळा वडगांव येथे वन्यजीव प्राण्यांविषयी जनजागृती

 राजिप शाळा वडगांव येथे वन्यजीव प्राण्यांविषयी जनजागृती




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
वडगाव : २३  ऑक्टोबर,



               रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव शैक्षणिक उपक्रमासमवेत पर्यावरणातील असलेल्या घटकांचा आभ्यास करण्यासाठी नेचर फ्रेंड सोसायटी यांच्या माध्यमातून वन्यजीव प्राण्यांविषयी जनजागृती नेचर फ्रेंड सोसायटी पनवेल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वन्यजीव बद्दल माहिती व मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने  सापांविषयी माहिती हा उपक्रम हाती घेण्यांत आला.
              मानवाच्या अतिक्रमणामुळे वन्य जिव मानवी वस्तीमध्ये प्रवेश करीत असतात.मात्र काही वेळा त्यांची शिकार केली जाते.मात्र त्यांना सुद्धा जगण्यांचा अधिकार आहे.निसर्गात विविध प्रकारच्या  सापांच्या जाती व त्यांची वैशिष्ट्ये आर्यन उद्रे यांनी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.त्याच बरोबर संतोष उदरे यांनी सापांच्या बाबतीत असलेले गैरसमज संदर्भात ८ वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
          या कार्यक्रमाचे सुत्र संचालन वैजनाथ जाधव यांनी केले.यावेळी प्रतीक शेंदरे,अक्षदा बैलमारे,संचयी म्हसकर,शिवांगी रासकर,अमीर जाधव,ऋषिकेश जाधव  सरस्वती कवाद व स्वयं सेविका उपस्थित होत्या.

चौकट 
वन्यजीव व सापांविषयीची मुलांची भीती दूर व्हावी व भूतदया मुल्य रुजावे.वन्यजीवाविषयी साक्षरता रुजविण्यासाठी या शिबिराचे आयोजन महत्त्वाचे वाटते. राजिप शाळा,वडगाव मुख्याध्यापक : सुभाष राठोड

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन