राधाकृष्ण तरुण मंडळ खरीवली येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

 राधाकृष्ण तरुण मंडळ खरीवली येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : १३ ऑक्टोबर,

            राधाकृष्ण तरुण मंडळ खरिवली व नवदीप महिला मंडळ खरिवली यांच्या सौजन्यांने नवरात्र उत्सवा निमित्ताने न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.खरिवली गावातील जेष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळातील तरुणांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन केलेले पाहायला मिळाले.न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा फेम हरेश पाटील पेण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न  झाला.यावेळी  खरिवली गावातील महिला व तरुणी ह्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला.
               खेळ पैठणीचा कार्यक्रमात निलिमा अमर ढगे यांनी प्रथम पारितोषिक मिळविला तर निकिता संजय हेलांडे द्वितीय तर मेघा मिलिंद दाभोलकर यांनी तृतीय क्रमांक मिलिवीला.सर्व विजेत्यांचे राधाकृष्ण तरुण मंडळ खरिवली व नवदीप महिला मंडळ खरिवली यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले.
           यावेळी जेष्ठ मान्यवर मिलिंद दाभोलकर, जनार्दन ढगे,राजेंद्र महाडिक, संजय महाडिक,अनिल गायकर  विलास गायकर,योगेश ढगे,राजेंद्र तटकरे,प्रमोद हेलंडे राजेंद्र गायकर,अमोल दाभोलकर,दिलीप महाडिक नारायण तळकर,यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
        या मंडळाचे अध्यक्ष सचिन दाभोलकर,खजिनदार संजय हेलंडे,सदस्य दत्ता भेसरे,अमर ढगे,सुरज घाटवल  प्रमोद गायकर,रतिश महाडिक,रोशन महाडिक,अजय ढगे अजय परबळकर,योगेश घालवला,सत्यवान बाटे,गणेश हेलंडे,विनायक तळकर,ऋतिक घाटवल,देवेंद्र गायकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी पणे केले. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर