गोपीनाथ ( गोपू नाना ) थोरवे यांचे अकस्मात निधन

 गोपीनाथ ( गोपू नाना ) थोरवे यांचे अकस्मात निधन 



पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
धा.वेणगाव ,कर्जत  :६  नोव्हेंबर,

             कर्जत तालुक्यातील धाकटे वेणगांव गावात राहणारे  वै.ह.भ.प.गोपीनाथ ( गोपू नाना ) रामजी थोरवे  यांचे राहत्या घरी बुधवारी  दि. ६ नोव्हेंबर,सकाळी ११: ३० वाजता अकस्मात निधन झाले.त्या वयाच्या ८४ वर्षाचे होते.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.                        
                   एक हुनहार,व्यक्तीमत्व,सयंमी,विचारवंत,  दुरदृष्टी,तसेच उत्तम शेतकरी म्हणून या परिसरात परिचयाचे होते.आयुष्यात खूप काही मिळवले,होते ती म्हणजे जिवाभावाची माणसे,त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने कुटुंब आणि ग्रामस्थ  यांच्या वरती शोककला पसरली आहे.                       
             त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा संभाजी गो.थोरवे, ,मुली,सुना,नातवंडे,पंतवडे जावई, असा मोठा परिवार आहे

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर