खालापुरात केंद्रस्तरीय आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धा उत्साहात संपन्न
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १३ डिसेंबर,
रायगड जिल्हा परिषद केंद्र खालापूर,यांच्या वतीने नुकताच विद्यार्थ्यांच्या केंद्रस्तरीय क्रीडा आणी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
खालापूर केंद्राचे केंद्रप्रमुख हेमंत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली १० ते ११ डिसेंबर या दोन दिवसीय विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत क्रीडा,व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, कांढरोली व कलोते मोकाशी शाळेचे मुख्याध्यापक जयश्री सुर्वे,व दिपक पालकर यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषविले होते.
तर या दोन दिवसीय स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाल्या.यामध्ये एकूण १७ शाळानी सहभाग घेतला होता,तर विध्यार्थ्यांनी विविध स्पर्धेचा खूप आनंद घेतला, मुलांच्यामध्ये उत्साह आणि खेळामध्ये चुरस यावेळी पाहण्यास मिळाली.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते हनुमंत पिंगळे आणि ग्रूप ग्रामपंचायत कलोते मोकाशी यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी मा.उपसभापती निवृत्तीभाऊ पिंगळे यांचेही कार्यक्रमास मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच केंद्रातील सर्वच शिक्षकवृंद यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यांसाठी खूप मेहनत घेतली.
0 Comments