राजिप शाळा वडगाव डिजिटल मध्ये मर्क लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड चे मोठे योगदान, रश्मी अयर यांच्या हस्ते अनावरण

 राजिप शाळा वडगाव डिजिटल मध्ये  मर्क लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड चे मोठे योगदान, रश्मी अयर यांच्या हस्ते अनावरण 






माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
वडगाव :१३ डिसेंबर,


          उत्कृष्ट ग्रामीण शाळा,म्हणून नावलौखिक मिळविले वडगाव शाळा असून मुख्यमंत्री माझी शाळा मोठे बक्षिस प्राप्त केलेली म्हणून गुणगौरव करण्यांत आला असून शाळेची प्रगति अधिक - अधिक व्हावी या उद्दात विचारांतून मर्क लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपल्या सीएसआर या निधीतून शाळेला एक ७५ इंची डिजिटल क्लासरूम (इन्ट्रॅक्टीव्ह स्मार्ट)बोर्ड  व संपूर्ण डिजिटल अभ्यासक्रम देऊन शाळेचे शैक्षणिक बळ दिले आहे.तसेच यांचे अनावरण कंपनीच्या मुख्य वितरण अधिकारी मा.रश्मी अय्यर यांच्या हस्ते उद्धघाटन कर लोकार्पण करण्यात आले.



       यावेळी कंपनीचे EHS & Security Head  प्रवीण भोसले,विशाल सर,प्रितम सर,गोपाळ सर,सागर सर तसेच ग्रुप ग्राम पंचायत वडगाव च्या मा. सरपंच गौरीताई महादेव गडगे,मुख्याध्यापक सुभाष राठोड,शिक्षक वैजनाथ जाधव,सरस्वती कवाद, पदविधर शिक्षिका मयुरी धायगुडे,स्वयं सेविका साक्षी,निकिता,आकांक्षा,भाग्यश्री या उपस्थित होत्या.

         

   यावेळी बोलताना मा.रश्मी अय्यर मॅडम यांनी शाळेचे कौतुक करत एक जिल्हा परिषदेची शाळा सुंदर व सुशिस्तीत असू शकते असे गौरउद्द्गार यावेळी त्यांनी काढले.तसेच शाळेला मुलांना शैक्षणीक साहित्य सुद्धा वाटप करण्यात आले.विद्यार्थी शिक्षक यांना लागणारी कोणतीही मदत करण्यास सकारात्मक भुमिका दाखविली.त्याच बरोबर शाळेसाठी कंपनी कडून CCTV बसवून देण्याचा ठराव घेण्यांत आला असून लवकरच आपल्याकडे CCTV बसवून दिले जाईल.असे आश्वासन शाळेय व्यवस्थानी  दिले.या कार्यक्रमाचे अभार संचालन मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी केले आहे.
           
--------------चौकट ------------- 
      मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध असून नियमित संपर्कात राहू.शाळेच्या भावी यशस्वी वाटचालीसाठी आम्ही कायम सोबत राहण्याचे आश्वासन दिले.
EHS & Security Head - प्रवीण भोसले


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर