श्री दत्त क्रिकेट संघ घोडीवली - कांढरोली क्रिक्रेट स्पर्धा ,कै. रामकृष्ण पालांडे स्मृती चषकाचा विजेता ठरला सहकार नगर
माय मराठी न्युज : नवज्योत पिंगळे
खालापूर : ९ डिसेंबर,
खालापूर तालुक्यातील ग्रामीण टेनिस सामन्याना सुरूवात झाल्याने ग्रामीण क्रिकेट खेळाडूमध्ये नवचैतन्य पसरले आहे.ग्रामीण क्रिकेट खेळाडूमधील दडलेल्या खिलाडू वृत्तीला वाव मिळावा उद्देशाने कै.रामकृष्ण पालांडे,लहू अर्जून पिंगळे,यांच्या स्मरणार्थ अविनाश पालांडे यांनी भव्य दिव्य क्रिकेट चषकाचे आयोजन समस्त श्री दत्त क्रिकेट संघ घोडीवली - कांढरोली आणि मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.
या ४ दिवशीय सामन्यामध्ये प्रथम क्रमांक सहकार नगर , द्वितीय धामणी, तृतीय माडप तर चतुर्थ क्रमांक घोडीवली संघाने पटकावल्याने या सर्व विजयी संघाना घोडीवली ग्रामस्थ व प्रमुख अथितीच्या हस्ते रोख रक्कम आणि आकर्षण चषक देऊन गौरवण्यात आले.
खालापूर तालुक्यामधील ग्रामीण भागात सर्वाचा आवड असलेला व लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेट खेळाकडे पाहिले जात आहे. या खेळाला ग्रामीण भागातील सर्व स्तरावर पसंती मिळत असून. या खेळाकडे अशीच अधिकाधिक तरुणाई आकर्षित व्हावी या दृष्टीने विविध स्तरावरून बक्षिसांची खैरात करीत क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले.
५ डिसेंबर ते ८ डिसेंबर अशा चार दिवशीय क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. या चार दिवशीय खेळीमेळीच्या वातावरण स्पर्धा पार पडल्याने प्रथम क्रमांक सहकार नगर संघाला ३० हजार रुपये रोख व भव्य चषक, द्वितीय क्रमांक धामणी संघाला १५ हजार रुपये रोख व चषक, तृतीय क्रमांक माडप संघाला ७,हजार ५०० रुपये रोख व चषक तर चतुर्थ क्रमांक घोडीवली संघाला ७ हजार ५०० रुपये रोख व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
उकृष्ट गोलंदाज , उकृष्ट फलंदाज , मालिकावीर खेळाडून आकर्षक ट्रॉफी देत गौरवण्यात आले.क्रिकेट चषकाचे आयोजक अविनाश पालांडे, अतुल पिंगळे, सोहम पिंगळे, रोहिदास पिंगळे,प्रमुख पाहुणे, रवी भोपी, अनिल,समीर पवार, बाबू पारंगे,प्रशांत पिंगळे, , सुभाष दुधावडे, अरुण पिंगळे संजय सोलखी, करण्यांत आले तसेच अनेक सामजिक,राजकीय,क्रिडा प्रेमी अशा विविध पाहुण्यांनी उपस्थिती दर्शवत खेळाडूचे कौतुक केले.
0 Comments