शेतीच्या कामासाठी बैलगाडीचे मोठे योगदान,पेंढा वहातुक,दळवळणांसाठी दैंनंदिन वापर
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली : १२ डिसेंबर ,
भात शेतीची कापणी झाल्यावर अनेक शेतकरी वर्ग आपल्या शेतात मळणी उभी करुन वेळ मिळाल्यास झोडणी करीत असतात.मात्र या पासून मिळालेला पेंढा सुरक्षितस्थळी ठेवण्यांसाठी शेतकरी वर्गांची मोठी धडपड सुरु आहे.पेंढा वहानांतून वहातुक केल्यांस खूप खर्च येत असतो.मात्र ज्या व्यक्तीकडे बैलगाडी असल्यांस या शेतीच्या कामासाठी त्यांचे मोठे योगदान ठरत असल्यांचे मत राम जाधव या शेतक- यांनी प्रतिनिधी बोलतांना व्यक्त केले. ज्या शेतकरी वर्गाकडे पशुधन आहेत त्यांना त्यांची चा-यांची व्यवस्था करावी लागत असते.ग्रामीण भागात एक दोन महिन्यात जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर बनत असतो.शिवाय जंगलात पावसाळी निर्माण होणारा चारा उन्हाळी सुकल्या मुळे त्यांचे गवतात रुपांतर होत असते मात्र ,वणव्या मुळे गवत जळून खाक होत असते. यामुळे शेतकरी वर्गाकडे मोठी समस्या निर्माण होत असते.यामुळे आताच वैरण साठविण्यांची लगबग सुरु असते.शेतक-यांच्या गुरे म्हणजे संसाराला हातभार लावणारी पाळीव जनावरे असा उल्लेख शेतकरी वर्ग करीत आहे. उन्हाळ्या मध्ये शेतक-याचा जास्तीजास्त वेळ शेतकामे करण्यापेक्षा जनावरांना चारा उपलब्ध करण्यामध्ये जात आहे. पुर्वी शेतात अथवा मैदानात जनावरे चरायला सोडले तरीही त्यांच्या खाद्याचा प्रश्न मार्गी लागत असे, मात्र आता वणवे ,औद्योगिकरण,माती उत्खलन,वृक्ष तोड या सर्व कारणामुळे पर्यावरणांचा समतोल ढासळत चालला आहे.त्यातच पाणी टंचाई ची झळ निर्माण होत असल्यांने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.गाय, म्हैस, बैल वाढत्या महागाईमुळे जनावरांच्या खाद्यात ही मोठया प्रमाणात वाढ झाली असून, शेतक-यांना पशुधन सांभाळणे मोठ्या कष्टाचे होत आहे.
-------- चौकट--------
पुर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकरी वर्गाकडे बैलगाडी असायची दळणवळण करण्यांसाठी यांचा मोठे योगदान होते.मात्र शेती कमी झाल्यामुळे बैलगाडी कालभाय होत चालली आहे.( बैल गाडी मालक,आंबिवली : लक्ष्मण जाधव )
-------- चौकट--------
पुर्वी प्रत्येक घरासमोर बैलगाडी असायची पावसाळा गेला की पुन्हा बैलगाडी रस्त्यावर दिसायची मात्र सध्या हे चित्र बदलत चालले आहे.आज आपण बैलगाडी तुरळक प्रमाणात पहावयांस मिळत आहे.भविष्यात हीच बैलगाडी पुस्तकात पहावयांस मिळेल का अशी शंका निर्माण होत आहे.( राजेश ज.पाटील : सामाजिक कार्यकर्ते,पर्यावरण प्रेमी )
0 Comments