३८ वर्षा मध्ये ३६ वेळा महेश निमणे यांचे रक्तदान

 ३८ वर्षा मध्ये ३६ वेळा महेश निमणे यांचे रक्तदान 




माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खोपोली : ६ डिसेंबर,

         रक्तदान सर्वांत श्रेष्ठ दान असे म्हटले जाते,रक्त आपण निर्माण करु शकत नाही मात्र आपले रक्त देवून अनेकांचे प्राण वाचवू शकतो.हे उदिष्टे डोळ्यासमोर ठेवून महेश निमणे यांनी अडत्तीस वर्षामध्ये छत्तीस वेळा रक्तदान केले असल्यामुळे मनाला एक समाधान मिळते.तसेच आपल्या शरिरात पुन्हा रक्त ते निर्माण होत असते.मात्र कोणतीही मनात भिती न बाळगता रक्तदान करा असे आवाहन त्यांनी केले आहे.
           गेले अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात उत्तम काम करीत असतांना वास्तुशास्त्र, रेकी, अंकशास्त्र कुंडल, लोलक शास्त्र यांच्या माध्यमातून हजारो परिवार सुखी समृद्ध केले आहेत.त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी जपत अदिवासी वाडी-वस्ती यांवर खाऊ आणि धान्य वाटप करुन माणुसकीचे नाते जोपाण्यांचे काम केले. 
            विद्यार्थ्यांचा उत्तम शिक्षण मिळावे तसेच त्यांचा गृहपाठ आणी शाळेतील शिक्षण सोपे जावे यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण - शहरी भागातील शाळा कॉलेज डिजिटल करुन  ई-लर्निंग सॉफ्टवेअर  लोक सहभागातून मोफत उपलब्ध करून देण्यांचे मोठे योगदान आहे. 



Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर