किड्स होम स्कुलच्या विद्यार्थ्यांचे रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत घवघवीत यश

 किड्स होम स्कुलच्या विद्यार्थ्यांचे रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत घवघवीत यश


राष्ट्रीय स्तरावरील हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धेत ८ सुवर्ण,४ कांस्य तर ५ रौप्य पदक प्राप्त 




माय मराठी न्युज :  हनुमंत मोरे
खोपोली / वावोशी : ६ डिसेंबर,

       खालापुर तालुक्यातील होराळे येथे सुरू असलेल्या किड्स होम स्कुलच्या संचालिका शालिनी शेखर विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील आलेख दिवसेंदिवस उंचावताना दिसत आहेत.२०२४ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कला गुणवत्तेच्या आधारावर रंगोत्सव व सेलिब्रेशन स्पर्धेत या शाळेतील विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. 
            या स्पर्धेमध्ये किड्स स्कूलच्या एकूण ११ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.हे विद्यार्थ्यी पुरस्काराचे मानकरी ठरल्यामुळे या शाळेचा शंभर टक्के यश मिळाल्याचे सिध्द झाले आहे.या स्पर्धेत आठ सुवर्ण,चार कास्य तर पाच रौप्य पदक मिळवून शाळेचे नाव उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे. 
             किड्स होम स्कूल खालापूर तालुक्यातील होराळे येथे असून याच्या संचालिका शालिनी शेखर विचारे यांनी शाळेच्या प्रगतीसाठी मागील काही वर्ष खर्ची पाडले आहेत.आपल्या शाळेतील विद्यार्थी हा एक आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविला जावा.यासाठी त्या सतत धडपडताना दिसत आहेत.आपल्या शाळेतील विद्यार्थी गुणवत्तेत तालुक्यात नव्हे तर राज्य व देश पातळीवर पहिल्या क्रमांकावर असावा हे त्यांचे स्वप्न असल्यामुळे त्या नेहमीच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटताना दिसत आहेत.
            नुकत्याच झालेल्या रंगोत्सव सेलिब्रेशन या राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत किड्स होम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून, या स्पर्धेत झालेल्या हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धेत सहभागी करण्यात आले होते.या स्पर्धेत १००% यश मिळवण्यात किड्स होम स्कूलच्या विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे.त्यामुळे या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शाळेच्या संचालिका तथा मुख्याध्यापिका शालिनी शेखर विचारे,सहशिक्षिक दुर्गा जयेश पाटील,पालक विद्यार्थी यांचे विशेष कौतुक केले जात आहे.


         -------- स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी -------
शिवांश अनिकेत दळवी(सुवर्ण),प्रियांशी विनायक भोईर (सुवर्ण,कांस्य), क्षत्रिय शेखर विचारे(सुवर्ण,कांस्य),दुहिता रितेश पाटील (सुवर्ण, रौप्य),अथर्वा संदेश पाटील (सुवर्ण),अंश नितेश पाटील (सुवर्ण,रौप्य), युवराज मंगेश पाटील (कांस्य),स्वरा विक्रम मोरे(रौप्य,कांस्य), प्रसिध्दी प्रविण पाटील (सुवर्ण),अनुज हरेश मोरे(रौप्य,कांस्य), शौर्य मनोज दळवी(सुवर्ण,रौप्य).

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर