उपसरपंच शंकर आखाडे यांनी घेतली आमदार गोपीचंद पडळकरांची भेट..
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १२ डिसेंबर,
बहुजनांचे नेते, नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांची नुकतीच तुंग गावाचे उपसरपंच शंकर आखाडे यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
बहुजन समाजाचे नेते भाजप महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांना सांगली जिल्हातील जत विधानसभा मतदार संघातून महायुतीने उमेदवार दिली होती,आमदार गोपीचंद पडळकर यांनी कॉग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांना अडोतीस हजारांनी दारुण पराभव करीत दणदणीत विजय मिळवला.
गोपीचंद पडळकर आमदार होताच त्यांचे कट्टर समर्थक असलेले मावळ तालुक्यातील तुंग गावचे उपसरपंच शंकर भागू आखाडे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या, यावेळी युवा नेते गजानन हिरवे, लक्ष्मण हिरवे, दिनेश मरगळे आदी उपस्थित होते,
0 Comments