मधुकर वामन घैसास ह्यांचे अल्पशा आजाराने निधन..
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : १२ जानेवारी,
खालापूर शहरात राहणारे मधुकर वामन घैसास यांचे राहत्या घरी गुरुवारी दि.९ जानेवारी , रोजी अल्पशा अजाराने निधन झाले.त्यांचे वय ८८ वर्षाचे होते.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. खालापूर शहरात तसेच पंचक्रोशी विभागात भिक्षुकी (भटजी )म्हणून त्यांच नाव लौकिक होतं.त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे. ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने त्यांच्या कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे. त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दि.१८ जानेवारी रोजी श्री क्षेत्र धाकटी पंढरी साजगाव येथे होणार आहे.तसेच त्यांचे उत्तरकार्य मंगळवार २१ जानेवारी रोजी खालापूर येथे त्यांच्या निवास स्थानी होणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,मुलगा ,मुली,बहिणी,सुना ,नातवंडे ,पंतवडे ,जावई, असा मोठा परिवार आहे.
0 Comments