घोडीवलीवाडी येथे मंदिराच्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण
सभागृहाकरता किरण ठाकरे यांच्या माध्यमातून १२ लाख रुपयाचा निधी उपलब्ध
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : २० एप्रिल,
खालापुर तालुक्यातील ग्रामीण नावंढे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील घोडीवलीवाडी येथील मंदिराच्या सामाजिक सभागृह बांधणे कामाकरता १२ लाख रुपयाचा निधी भाजपचे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झाल्याने हे काम पूर्णत्वास गेल्याने या कामाच्या सभागृहाचे लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडल्याने सर्व ग्रामस्थांनी ठाकरे यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
भारतीय जनता पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे हे भाजपाचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपचे प्रभारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापुर विधानसभा मतदारसंघात काम करत असताना रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी आणत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात प्रलंबित विकास कामे मार्गी लावत असल्याने अनेक कामे मार्गी लागल्याने भाजपच्या कामगीरीवर सर्वसामान्य जनता खुश असल्याचे पाहायला मिळत आहे.यांनी घेतलेल्या सामाजिक बांधिलकीचा वसा बाबत समाधान व्यक्त करत आहेत.
यावेळी भाजपा कर्जत खलापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे, खालापूर पंचायत समितीचे मा. उपसभापती निवृत्ती पिंगळे, नावंढे मा. सरपंच शेखर पिंगळे, भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जगदीश आगीवले, भाजपचे प्रज्ञेश खेडकर, कृष्णा पवार, स्वप्निल फराट, शरद पिंगळे, वैभव पिंगळे, रुपेश फराट, गणेश पिंगळे, संजय देवकर, निखिल फराट, विलास पिंगळे, रविंद्र जाधव आदी प्रमुखासह मोठ्या संख्येने परिसरातील वारकरी संप्रदायातील मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------- चौकट ----------------
भाजपाचे प्रभारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापुर विधानसभा मतदारसंघात असंख्य प्रलंबित विकास कामे मार्गी लागले असून पुढील काळातही असंख्य विकास कामे मार्गी लागणार असल्याने या कामांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी पुढील काळातही तत्पर कार्य करीन.
विधानसभा अध्यक्ष भाजपा - किरण ठाकरे
0 Comments