लोहप येथे गतिरोधक बसणार,सामाजिक कार्यकर्ते अतुल मालकर यांच्या मागणीला हिरवा कंदिल
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
लोहप : १९ एप्रिल,
सावरोली खारपाडा हा रस्ता औद्योगिक करणांसाठी ओळखले जात असले तरी सुद्धा या मार्गावर ,अनेक गावी या रस्त्यालगत आहेत.लोहप हे सध्या गजबलेले ठिकाण म्हणून ओळखले जात असल्यामुळे या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल, मराठी शाळा, कारखाने आहेत व त्यामुळे लोहोप या नाक्या लगत येथे अपघात घडल्यांचे निदर्शनास आले आहेत. यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविणेबाबत विनंती सामाजिक कार्यकर्ते अतुल मालकर यांनी केली होती.यामुळे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल - संदीप र. चव्हाण यांनी या संदर्भात वरिष्ठांकडे पत्र व्यवहार केल्यांचे समजते.
ह्या मार्गावर काही ठिकाणी गतिरोधक टाकण्यांत आले.असून सुरक्षतेच्या संदर्भात कोणतीही उपाय योजना दिसत नाही.ह्या मार्गावर सातत्याने वाहतुक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे वाहनांचा वेग वाढत आहे.मात्र यावरती अंकुश ठेवण्यांचे काम गतिरोधक करीत असते.या सर्व बाबीचा आभ्यास करुन ज्या ठिकाणी गाव असेल त्या ठिकाणी हे गतिरोधक बसविणे गरजेचे आहे.
लोहप हा नाका असून या ठिकाणी दुकाने हॉस्पिटल शाळा,तलाठी कार्यालय असल्यामुळे येथे नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात पहावयांस मिळत असते.यामुळे भविष्यात कोणताही मोठे संकट निर्माण होण्याअगोदर या ठिकाणी लवकरात -लवकर गतिरोधक बसवावे अशी मागणी या मार्गावरुन प्रवास करणारे कामगार,शाळकरी मुले,प्रवासी वर्ग करीत आहे.
0 Comments