खालापूर शहरात भाजप कडून सदस्य मोहीमेला उदंड प्रतिसाद

 खालापूर शहरात भाजप कडून सदस्य मोहीमेला उदंड  प्रतिसाद




माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : ३ जानेवारी,

         भाजपचे सदस्य अभियान संघटन पर्व, सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात सुरू आहे.या अनुषंगाने आज खालापूर पोलीस स्टेशन बाहेर खालापूर पूर्व मंडल अध्यक्ष सनी यादव यांच्या नेृत्ववाखाली खालापूर भाजप शहर व खालापूर तालुका पूर्व मंडळातील कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून सदस्यता मोहिमेत सामील होऊन आपला सहभाग नोंदवला.
             खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सर्वच शासकीय कार्यालय हे खालापूर मध्ये आहेत यावेळी तालुक्यातून अनेक नागरिक हे कामासाठी येत असतात.त्यावेळी येणाऱ्या नागरिकांनी सुद्धा भाजपा सदस्यता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
          यावेळी भाजपा शहर अध्यक्ष दिपक जगताप यांनी आपली जबाबदारी चोख बजावली,खालापूर पूर्व मंडल अध्यक्ष सनी यादव,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे,खालापूर तालुका सरचिटणीस रविंद्र पाटील,कर्जत विधानसभा युवा मोर्चा निवडणुक प्रमुख प्रसाद पाटील,चौक येथील युवा नेते विनोद भोईर,खालापूर शहर सरचिटणीस योगेश जाधव,भाजपा शहर उपाध्यक्ष - अमीर पारठे,भाजपा शहर उपाध्यक्ष - विलास पाटील ,हनुमंत पारठे विशाल लोते आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खालापूर पोलिसांकडून रेझिंग डे निमित्ताने सायबर क्राईम जनजागृती,