खालापूर पोलिसांकडून रेझिंग डे निमित्ताने सायबर क्राईम जनजागृती,
महिला,बाल सुरक्षा, वाहतूक नियमाचे दिले धडे
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : ५ जानेवारी,
खालापूर पोलीस सातत्याने विविध उपक्रम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करीत असतात.मात्र रेझिंग डे निमित्ताने विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल गोरठण बुद्रुक येथे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तसेच पहल नर्चरिंग लाईव्ह कौशल्य प्रशिक्षण केंद्र खालापूर या दोन ठिकाणी सायबर क्राईम जनजागृती करण्यांत आली.तसेच कोणतीही अपत्ती स्थिती निर्माण झाल्यांस पोलीसांशी संपर्क करण्यांचे अवाहन करण्यांत आले.
शाळे पासून काही विद्यार्थ्यांचे घरचे अंतर लांब असते.अश्या वेळी कोणतीही समस्या अथवा प्रसंग निर्माण झाल्यांस ११२, पोलीस काका, पोलीस दिदी यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले.त्याच बरोबर सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर, वेबसाईट बाबत माहिती देण्यात आली.यावेळी पोलीसांच्या जवळ असलेले शस्त्रांची ओळख करून देण्यात आली.
दैनंदिन जिवनात आपल्याला कधी - कधी विविध समस्यांना सामोरे जावे लागत असते.यामुळे येणा-या तक्रारी/समस्यांबाबत चर्चा करण्यांत आली.तसेच महिला व बाल सुरक्षा, वाहतुक नियमन, सायबर क्राईम,व गुन्हे घडु नयेत याबाबत कोणती दक्षता घ्यावयाची याबाबत माहिती विद्यार्थी व शिक्षकांना देण्यांत आली. यावेळी पोनि - सचिन पवार, सपोनि - अलोक खिस्मतराव ,जगधने,भोईर,कांबळे,गणेश चौधरी,पवार,अदि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.



0 Comments