राजिप शाळा कांढरोली तर्फे वनखळवाडीत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न...

 राजिप शाळा कांढरोली तर्फे वनखळवाडीत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न...



माय मराठी न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २६  फेब्रुवारी 

              रायगड जिल्हा परिषद शाळा कांढरोली तर्फे वनखळवाडी येथे सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा मोठया उत्साहात पार पडला. दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात येत असल्यामुळे या वर्षी मुलांनी विविध गाण्यांवर  नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
           या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हेमंत म्हात्रे यांची निवड करण्यात आली.यावेळी सुनील गायकवाड, रवी पवार,जनाबाई पवार, तुकाराम वाघे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दिपक पालकर, उमेश विचारे संदीप जाधव, आदी उपस्थित होते.
          हा सांस्कृतिक सोहळा यशस्वी करण्यांसाठी  शाळेचे मुख्याध्यापक संजय चव्हाण, श्रीकांत पोकळे  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर पवार, आणि ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments

विक्रम गायकवाड यांच्या अभिष्ठचिंतनास प्रितम म्हात्रे यांची उपस्थिती,भावी सरपंच म्हणून कार्यकर्ते यांची ललकारी