लोहप येथे मद्यधुंद अवस्थेतील ट्रक चालकांनी तीन वाहनांचा केला अपघात

 लोहप येथे मद्यधुंद अवस्थेतील ट्रक चालकांनी  तीन  वाहनांचा केला अपघात


रस्त्यावर गतिरोधक बसविल्यास अपघात टळतील.मा.  उपसरपंच बबन पाटील




माय मराठी न्युज : साबीर शेख
लोहप : २६ फेब्रुवारी

              मंगळवार रात्री १०:३० च्या सुमारास वाशिवली येथून इसांबे गावाच्या  दिशेला  जाणाऱ्या  MP- 09 -HH- 8688 या खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या भरधाव  टँकर ने लोहप् स्टॉप जवळ उभ्या असलेल्या चार चाकी वाहन  MH- 46 -CH- 7009 व MH- 46 -AL-1420 अश्या दोन वॅगनार तसेच दुचाकी   MH- 46- CB -3994  या वाहनांना  जोरदार धडक दिली. सदर जखमींना स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने खाजगी रुग्णालयात  उपचारासाठी पाठवले असून अपघातात कुठलेही जीवितहानी झाली नाही, अपघात ग्रस्त  लोहप्, कोपरी ,दांडवाडी तळवली येथील असल्याचे समजते . घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी  मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाला  पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिला.
                 सदर माहिती कळताच  घटनास्थळी तात्काळ पोलीस स्टेशनचे अधिकारी जाधव व सूर्यकांत ठोंबरे  यांनी पुढील अपघाती ठिकाणची परिस्थितीत नियंत्रणात आणून वाहतूक व्यवस्था सुरळीत करून घटनेचा पुढील तपास व कारवाई चालू केली. इसांबे येथे मोठ्या प्रमाणात  विस्तारीत होत असलेल्या औद्योगिकी कारणामुळे रस्ता अरुंद पडत असून  अवजड वाहनांच्या रहदारी मुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने अरुंद रस्त्यावर  गतिरोधक नसल्याने भरधाव वाहनांच्या मुळे लोहप् स्टॉप हे अपघाती क्षेत्र ठरत  आहे .
          यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सतत होत असलेले अपघात टाळण्यासाठी  सदर ठिकाणी तात्काळ  गतीरोधक बसवावे अशी मागणी माजी उपसरपंच बबन दादा पाटील व स्थानिक ग्रामस्थांनी केली .

Post a Comment

0 Comments

क्रिकेट महोत्सवात,असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश