शंभर वर्ष पुर्ण झालेल्या लोकमान्य टिळक मोफत वाचनालय,चौक यांस शहाबाद येथे सन्मानित
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
चौक : २५ फेब्रुवारी,
ऐतिहासिक वारसा लाभलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहकारी सरनौबत नेताजी पालकर यांचे चौक हे जन्म गाव म्हणून प्रसिध्द याच ठिकाणी लोकमान्य टिळक मोफत वाचनालय व ग्रंथालय आहे.नुकताच ५९ वे वार्षिक अधिवेशन,शहाबाज येथे आयोजित करण्यांत आले होते.यावेळी शंभर वर्ष पुर्ण झालेल्या या वाचनालयास सन्मानचिन्ह,सन्मानपत्र संस्थेचे सचिव सतिष आंबवणे व ग्रंथपाल - अभिजीत चौधरी यांस देवून गौरविण्यांत आले.
रायगड जिल्हामध्ये एकुण ६२ सार्वजनिक शासनमान्य ग्रंथालये आहेत.त्यातील ११ ग्रंथालयांनी शताब्दी पुर्ण केली असून या अधिवेशनांच्या निमित्ताने शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत चौक चे लोकमान्य टिळक मोफत वाचनालय हे १०५ वर्षे झाली असून अध्यक्ष सुरेश आप्पा वत्सराज यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय आज ही सुरळीत पणे सुरु आहे.
यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील,जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार तसेच अदि या अधिवेशनात उपस्थित होते.
0 Comments