रायगड परिक्षेत्रामध्ये १७ ठिकाणी राबविले ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान, खालापूर जवळील पुंडलिक मंदिर नदि किनारा केला स्वच्छ
पाणी प्रकृतीचा अमूल्य उपहार, त्याचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी - निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : २४ फेब्रुवारी,
परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन आशीर्वादाने २३ फेब्रुवारी २०२५ ची स्वर्णिम प्रभात एक नवीन जागृती व सेवेच्या दिव्य प्रकाशाचा संदेश घेऊन आली ज्यामध्ये ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याचे आयोजन विश्वभरात केले गेले आणि त्याबरोबरच दिल्लीतील निरंकारी मिशनच्या ग्राउंड नं ८ येथे एक विशाल सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या अभियाना अंतर्गत रायगड जिल्ह्याच्या खरसई झोन मध्ये एकूण १७ ठिकाणी जलस्त्रोताची स्वच्छता करण्यात आली.ज्यामध्ये सुमारे २ हजारहून अधिक निरंकारी सेवादल स्वयंसेवक व भाविक भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. खालापूर तालुक्यातील खोपोली, सावरोली ब्रँच वतीने पुंडलिक मंदिर देवस्थान नदीपात्र परिसर, व ताकई स्मशानभूमी येथे हे अभियान राबविण्यात आले.
संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाज कल्याण प्रभारी जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की देशभरात राबविलेल्या ‘अमृत प्रोजेक्ट’ परियोजनेच्या दरम्यान सर्व सुरक्षा मानकांचे पूर्णपणे पालन करण्यात आले. युवावर्गाचा विशेष सहभाग हा अभियानाचा मुख्य आधार होता. त्यांनी हेही सूचित केले, की ही मोहीम केवळ एका दिवसापुरती सीमित नाही, तर दरमहा विविध घाट व जलस्त्रोताची स्वच्छता निरंतर चालू राहील.
संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने, पूज्य बाबा हरदेवसिंहजी यांच्या असंख्य दिव्य शिकवणूकींतून प्रेरणा घेत या पावन अभियानाचे आयोजन करण्यात आले. पूर्वीप्रमाणेच याही वर्षी ‘चला सावरु, यमुना किनारे’ असा उद्घोष करत या अभियानाला आणखी व्यापक स्वरूप देण्यात आले.
२७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील १ हजार ६५० पेक्षा अधिक ठिकाणी १० लाखांहून अधिक संख्येने सेवाभावनेने ओतप्रोत स्वयंसेवक भक्तगणांनी एकाच वेळी हे महान अभियान साकारले.हे दृश्य केवळ प्राकृतिक स्वच्छतेपर्यंत सीमित न राहता, अंतर्मनाला निर्मळ आणि पवित्र करण्याऱ्या एका आध्यात्मिक यात्रेचे सुंदर प्रतीक बनले. प्रत्येक श्रद्धाळु भक्ताची समर्पित उपस्थिती या गोष्टीचे प्रमाण होते, की जेव्हा प्रेम, सेवा आणि समरसतेचा दिव्य संगम होतो तेव्हा प्रकृतीही नवजीवनाचा अनुभव घेते.
सतगुरु माताजींनी पाण्याच्या महत्व अधोरेखित करताना समजावले, की पाणी अमृतासमान आहे जे प्रकृतीने आपल्याला सर्वोत्तम उपहाराच्या रुपात प्रदान केले आहे. त्याची स्वच्छता आणि संरक्षण ही केवळ एक जबाबदारीच नव्हे, तर आमची स्वाभाविक सवय बनून गेली पाहिजे. बऱ्याचदा अजाणतेपणे आपण वापरा व फेकून द्या अशा वस्तू व घाण जलस्रोतांमध्ये टाकून प्रदूषणात भर घालत असतो ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते. याच चिंतनातून प्रेरित होऊन ‘प्रोजेक्ट अमृत’ सारख्या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे जी जल संरक्षण आणि स्वच्छतेच्या प्रति जागरुकता पसरविण्याचा एक महत्वपूर्ण प्रयास आहे.
बाबा हरदेवसिंहजी यांच्या जन्मदिवसाला समर्पित असलेल्या या पवित्र सेवा अभियानात प्रत्येक भक्ताला जल संरक्षणाच्या दिशेने योगदान देण्याची संधी मिळाली. हा पुढाकार केवळ घाट आणि जलस्रोतांच्या स्वच्छतेवर केंद्रीत नसून घरांमध्येही लहान-सहान सवयींतून जल बचतीला प्रोत्साहित करत आहे ज्यायोगे पाण्याचा आदर व्हावा आणि हे अमूल्य संसाधन भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित राहू शकेल.
0 Comments