खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांची क्यू आर कोडची संकल्पना नाविण्यपूर्ण

 खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांची क्यू आर कोडची संकल्पना नाविण्यपूर्ण  

 
महसुली अर्धन्यायिक निकाल क्यू आर कोडद्वारे नागरिकांना मिळणार घरबसल्या



माय मराठी न्युज : समाधान दिसले 
खालापूर : २६ फेब्रुवारी 

        खालापुर तहसील कार्यालयात अनेक नागरिकांना आपल्या संबंधित असंख्य खटल्यांचा निकाल प्राप्त करण्यासाठी अनेक वेळा असंख्य फेऱ्या मारावे लागतात, परंतु आता या फेऱ्यांना पूर्णविराम मिळणार असून खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी नाविण्यपूर्ण संकल्पना राबवत महसुली अर्धन्यायिक निकाल क्यू आर कोड द्वारे नागरिकांना घरबसल्या मिळणार असल्याने तहसीलदार अभय चव्हाण यांच्या कार्याचा सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
             ॲड.जयेश तावडे यांनी खालापूर तहसील कार्यालयाला भेट देऊन क्यू आर कोडबाबत माहिती घेतली असता क्यू आर कोड कसा स्कॅन करावा याबाबत संबंधित विषय हाताळणारे खालापूर तहसील कार्यालयातील महसूल सहायक सारंग हेमंत राठोड यांनी संपूर्णपणे माहिती सांगत अर्धन्यायिक प्रकरणात दिला जाणाऱ्या निकालाची समज या प्रतीच्या क्यूआर कोड दिला जाणार असून अर्जदार व सामनेवाला तसेच हित संबंधित व्यक्ती यांनी सदरचा क्यु आर कोड आपल्या मोबाईल वरील गुगलवर जाऊन गुगल लेन्स द्वारे (google lens) स्कॅन करावा सदर क्यूआर कोड (Q R CODE ) स्कॅन केल्यानंतर निकालाची सहीची प्रत पाहता येणार असून सदर प्रत डाऊनलोड करता येणार आहे तसेच इतरांना देखील पाठवता येणार आहे.
                    तसेच महसूल विभागामार्फत दिल्या जाणारे अर्धन्यायिक निकाल निर्णय खालापूर तालुक्यात प्रथमच क्यू आर कोडच्या माध्यमातून देण्याचा नाविन्यपूर्ण निर्णय तहसीलदार अभय चव्हाण यांच्या माध्यमातून खालापूर तहसील कार्यालयात राबविला जात आहे. शासकीय कामांमध्ये अधिक पारदर्शकता क्यू आर कोडच्या निर्णयामुळे येणार असून नागरिकांना घरबसल्या निकाल मिळणार आहे.
           तहसील खालापूर यांचा हा स्तुत्य उपक्रम वाखाण्याजोगा असल्याची प्रतिक्रिया ॲड.जयेश तावडे यांनी व नागरिकांनी बोलताना व्यक्त केलेली आहे.
तसेच अर्जदार व सामनेवाला यांना केवळ निकालाची समज देण्याबाबत कायद्यात व शासन निर्णयात तरतूद असल्याने निकालाची समज देताना त्या पानावर हे क्यूआर कोड असणार आहे, त्यामुळे हे क्यू आर कोड स्कॅन करून पूर्ण आदेश घरबसल्या नागरिकांना पाहता येणार आहे आणि सदरचे निकाल पत्र हे सहीचे असल्याने पुन्हा नकल काढण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे अर्जदार - सामनेवाला व इतर संबंधित व्यक्ती यांना मोठा दिलासा मिळालेला आहे व त्याचा त्यांना फायदा होणार आहे, त्यामुळे शासकीय कामात सुद्धा पारदर्शकता येऊन तत्परता येणार आहे या कार्याचा समस्त खालापूरकरांकडून मोठ्या आनंदाने स्वागत केला जात आहे.
                  तसेच शासकीय कागदपत्रे मिळण्याकरता जलद गती मिळण्याकरता आदरणीय तहसीलदार अभय चव्हाण यांनी केलेल्या संकल्पनेचा नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments

क्रिकेट महोत्सवात,असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश