तहसीलदाराच्या दालनांत विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शन
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : २८ फेब्रुवारी,
रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव विविध उपक्रमात सातत्याने चर्चेत असल्यामुळे आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने विज्ञान प्रयोगाचे आयोजन खालापूर चे तहसीलदार अभय चव्हाण,व निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, गटशिक्षणाधिकारी कैलास चोरामले यांच्या उपस्थित त्यांच्या दालनात विद्यार्थ्यांनी प्रयोग सादरीकरण केले.त्यांच्या मध्ये असलेले कौशल्य आणी सहज आणी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगत असल्यामुळे तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांच्यावर कौतुकांची थाप टाकत मुलांचे कौतुक केल.
यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेवून उत्तम असे प्रयोग सादर करण्यात आले.शाळेय शिक्षण घेत असतांना हे विज्ञान विषय हे अभ्यास क्रमात असल्यामुळे तसेच प्रयोगाच्या माध्यमातून आपण त्यांचा दैनंदिन जिवनात यांचा उपयोग करुन आपला बहुमूल्य वेळ वाचावू शकतो.आपल्या घरामधून टाकावू अथवा बाजार पेठेत सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू पासून त्यांचे प्रयोग करुन विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांमध्ये असलेली कला विकसित व्हावी शिवाय त्यांना विज्ञान विषयी जागृतता निर्माण झाल्यांस या प्रयोगाच्या माध्यमातून भविष्यात मोठे वैद्यानिक होतील ह्या दृष्टीकोणातून विज्ञान प्रदर्शन आयोजन शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून करून घेतले जात असल्यांचे मुख्याध्यापक सुभाष राठोड,शिक्षका सरस्वती कवाद,वैजनाथ जाधव उप शिक्षक स्वयं सेविका निकिता गडगे,साक्षी जांभुळकर,अदि उपस्थित होते.
0 Comments