आश्रम शाळा वरसई येथे विज्ञान साजरा,मुलांनी केलेल्या प्रयोगांचे अनेकांना भुरळ
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खोपोली : १ मार्च,
प्रथम एज्यूकेशन फाउंडेशन संस्थे द्वारा अनुदानित आश्रम शाळा वरसई येथे २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनांचे औचित्य साधत,बाल विज्ञान मेळावा यांच्या माध्यमातून प्रथम विज्ञान केंद्र चिलठण यांने आयोजित करण्यात आला.यावेळी ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांद्वारा विज्ञानातील सोपे व सहज प्रयोग सादर करुन उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.यावेळी त्यांनी केलेल्या प्रयोगांचे अनेकांना भुरळ पडली असल्यांचे पहावयास मिळाले.
राष्ट्रीय विज्ञान दिन सी.व्ही. रमण यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी साजरा केला असल्यामुळे दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या वैज्ञानिक दिनदर्शिकेत एक महत्त्वाचा दिवस असून.भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांनी १९२८ मध्ये रमन इफेक्टचा शोध लावला होता. या अभूतपूर्व शोधासाठी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संप्रेषण परिषदेनं हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.भारत सरकारनं हा प्रस्ताव स्वीकारत १९८७ पासून, हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
या विज्ञान मेळाव्याचे अनावरण शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले.प्रथम संस्थेच्या विज्ञान प्रोग्राम च्या प्रमुख जयश्री माने यांनी मेळाव्याला उपस्थित राहून मुलाना प्रोत्साहित करण्यांचे काम केले.यावेळी शिक्षक कर्मचारी आणि प्रथम चे सेंटर इंचार्ज रणजित वाघमारे व सहकारी अश्विनी भगत, विजय वानखडे, पूजा भोईर आणि अमोल भुसारी अदि उपस्थित होते.
0 Comments