नारंगी गावच्या ज्येष्ठ महिला अनुसयाबाई देशमुख यांना देवाज्ञा
माय मराठी न्युज : समाधान दिसले
खालापूर : २ मार्च,
खालापूर तालुक्यातील नारंगी गावचे सामाजिक कार्यकर्ते रमाकांत देशमुख यांच्या मातोश्री अनुसयाबाई भाऊराव देशमुख यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ९८ वर्षे होते.त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबीयांसह सबंध पंचक्रोशीतील वातावरण शोकाकुल झाले आहे.
अतिशय प्रेमळ, सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या अनुसयाबाई भाऊराव देशमुख या सर्व मित्र परिवार यांच्यामध्ये विशेष प्रिय होत्या. अतिशय काबाडकष्ट करून त्यांनी आपल्या मुलांना लहानाचे मोठे केले. कुटुंबात शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभामुळे सर्वांनाच त्या खुप आवडत्या होत्या. आपल्या सुनांवर त्यांनी मूलीसारखे प्रेम केले. पारंपारिक सणासुदिच्या कार्यक्रमात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत. वृद्धापकाळामुळे त्यांची नारंगी येथील राहत्या निवासस्थानी प्राणज्योत मालवली, त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या अंत्ययात्रेकरीता मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यांच्या पश्चात रमाकांत, शशिकांत, संजय हि तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांचे दशक्रिया बुधवार, दि.०५ मार्च रोजी उद्धर रामेश्वर (सुधागड) येथे तर उत्तर कार्य शनिवार दि.८ मार्च रोजी रोजी नारंगी येथील राहत्या निवासस्थानी करण्यात येणार आहेत.

0 Comments