पाहाटेचा गजर स्वच्छतेचा,हातात झाडू,मुखात नामस्मरण,श्री सदस्यांचे स्वच्छतेसाठी सरसावले हात

 पाहाटेचा गजर स्वच्छतेचा,हातात झाडू,मुखात नामस्मरण,श्री सदस्यांचे स्वच्छतेसाठी सरसावले हात 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा                                                 वाशिवली  : २  मार्च 

             डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्यांने व जेष्ठ निरुपणकार डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी  आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली  डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी पुर्तीसोहळा निमित्ताने डॉ.पारनेरकर हायस्कूल- वाशिवली ,इसांबे शाळा, अंगणवाडी,प्राथमिक आरोग्य केंद्र- लोहोप,माजगांव पोस्ट ऑफिस व,माडप शाळा व या ठिकाणी असलेले  ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छ करण्यांत आले.यावेळी हा परिसर स्वच्छ करण्यासाठी  हजारो श्री सदस्यांच्या मुखात नामस्मरण आणी हातात झाडू घमेले,फावडे खुरपणे घेवून स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते.       


             
                                                                   सकाळी ७ : ३० वाजता स्वच्छता अभियान   
ला सुरुवात करण्यात आली.यावेळी ओला कचरा, सुका कचरा यांचे वर्गीकरण करण्यांत आले.यावेळी श्री सदस्य यांनां सुरक्षा साधने देण्यात आले.वातावरणात उष्णता जरी असली तरी सुद्धा त्यांची तमा न बाळगता स्वच्छता करण्यासाठी हात पुढे सरसावत होते. परिसर स्वच्छ करतांना चेहर-या वरती एक प्रकारचे समाधान दिसून येत होते.कारण आपण चांगले काम करीत आहेत.हा परिसर शहर स्वच्छ झाले कि रोगराई पसरणार नाही.यामुळे माणूस निरोगी राहील आणि माणसाला उत्तम आरोग्य राखण्यास मदत होत असते.                               

                अशी शिकवण बैठकीच्या माध्यमातून मिळत असते.या विचारांने श्री सदस्यांनी या परिसरातील सर्वच ठीकांनी  साफ- सफाई करण्यात व्यस्त झाले होते.डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानद्वारे विविध सामाजिक कार्य राबविण्यात असतांना समाजाला स्वच्छतेचे महत्व जाणून घेता यावे या उद्देशाने एक पाउल पुढे टाकत हा उपक्रम हाती घेण्यांत आले. 


 

 

Post a Comment

0 Comments

टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी,विद्यालयाचे काम कौतुकास्पद नंदकुमार वाळंज