तळवली दांड वाडीतील घरांचे मोठे नुकसान,चक्री वादळा
दोन वर्षापुर्वी झालेल्या घरांचे नुकसानीचे पंचनामे राहिले कागदावच !
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
तळवली दांडवाडी ५ एप्रिल,
काल झालेल्या चक्री वादळाने नागरिक चांगलेच हादरले असून या चक्री वादळामुळे तळवली दांड वाडी येथिल अनेक घरांचे नुकसान तर काही ठिकाणी सौम्य नुकसान झाले.ही बाब निदर्शनास येताच तळवली येथिल सामाजिक कार्यकर्ते अतुल मालकर यांनी तातडीने या वाडीमध्ये भेट देवून पंचनामे करावयास सांगितल्यांने.या वादळांची तीव्रता खूप असल्यामुळे घराचे कौल,तसेच पत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यांचे पहावयास मिळाले.त्याच बरोबर काही ठिकाणी बत्ती गुल झाल्यांचे अनेकांना रात्र अंधारात काढावी लागली.
या चक्री वादळामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे.२०२३ मध्ये असेच घराचे नुकसान झाले.मात्र पंचनामे करुन सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नसल्यांचे खंत येथिल ग्रामस्थांनी व्यक्त केली.
घर बांधताना प्रत्येकांनी पैश्याची थोडी बचत करुन घर बांधले. मात्र चक्रीवादळाने सर्व काही हिरावून घेतले आहे. कोरोना सारख्या संकटातून सावरत अनेक वर्ष गेली मात्र चक्री वादळाने दिलेल्या तडाक्यामुळे घरांचे नुकसान झाले आहे.
मात्र पंचनामे करुन सुद्धा हवी तेवढी रक्कम मिळतच नाही.एप्रिल महिन्यातील अवकाळी पाऊस हा नागरिकांच्या मुळावर उठत असल्याचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळाले.मात्र असे असले तरी सुद्धा निसर्गाच्या या चक्रला कोणीही थांबवू शकत नसल्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या पुढे हतबल होत आहे.या चक्री वादळामध्ये हरिश्चंद्र वाघे,अनंत वाघे,रामदास पवार,बबन वाघे,मोहन हिलम,अनंता हिलम, दिलीप पवार,नकुल वाघे,सदा वाघे, विठोबा जाधव,प्रभाकर वाघे,भीमा वाघे,शिवाजी वाघे, परशुराम पवार, शंकर पवार,सुरेश जाधव, रघुनाथ जाधव, गणेश कातकरी,
यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचानामे करण्यातआले.असून नुकसान भरपाई कधी मिळेल याकडे या कुटुंबाचे लक्ष लागले आहे.
------------ चौकट ------------
काल झालेल्या चक्री वादळाने तालुक्यातील काही गावातील घरांचे नुकसान झाले असून तलाठी काल पासूनच कामाला लागले आहे.सोमवार पर्यंत सर्व पंचनामे पुर्ण करुन शासनाकडे पाठविले जातील
तहसीलदार खालापूर - अभय चव्हाण
------------ चौकट ------------
तळवळी दांड वाडी येथे चक्री वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून आम्ही त्या ठिकाणी जावून तातडीने पंचनामे करुन अहवाल पुढे पाठविण्यात येणार आहे. ( अभिजीत हिवरकर तलाठी इसांबे )
------------ चौकट ------------
एप्रिल महिन्यातील चक्रीवादळ झाले असून अनेकांचा संसार उघड्यावर आले आहे, तळवली दांडवाडी येथिल झालेल्या घरांच्या नुकसाने समजताच तातडीने तलाठी यांच्याशी संपर्क करून नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे प्रक्रिया सुरु झाली आहे . ( अतुल मालकर सामाजिक कार्यकर्ता - तळवली )
------------ चौकट ------------
काल झालेल्या चक्री वादळामुळे गावातील घरांचे नुकसान झाले आहे. सदर पंचनामे झाले असून त्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी ( हरिश्चंद्र वाघे - ग्रामस्थ - तळवली दांडवाडी )
------------ चौकट ------------
तळवली दांडवाडीतील घरांचे नुकसान झाल्यांचे आम्हास निदर्शनास आले असून ग्रुप ग्रामपंचायत वडगाव यांच्या माध्यमातून जे दाखले हवे ते आम्ही नुकसान ग्रस्तांना तातडीने दिले जाणार आहे.( ग्रुप ग्राम पंचायत अधिकारी वडगांव - सुहास वारे )
0 Comments