आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या अभिष्टचिंतन निमित्ताने आरोग्य तपासणी
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : ३ एप्रिल,
खालापूर शिवसेना शहर व नगरपंचायत यांच्या सौजन्याने कर्जत खालापूरचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर आयोजित करून विविध गरजू नागरिकांना मोफत उपचार व औषधांचा वाटप या निमित्ताने करण्यात आले.
पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे हस्ते श्रीफळ वाढून या महाआरोग्य शिबिराची सुरुवात करण्यांत आली.हे शिबिर नेताजी पालकर सभागृह खालापूर तहसील ऑफिस लगत असल्याने या शिबिरा करता तालुक्यासह शहरातील अनेक महिला पुरुष व गरजू नागरिकांनी आपली नोंदणी करून आपली आरोग्य तपासणी करून घेतली.शिबिरात एकूण १५९ लाभार्थींनी नोंदणी करून तपासणी करून घेतली तसेच २० रुग्णांना डोळ्याच्या नेत्र बिंदू सुरज हॉस्पिटल सानपाडा येथे मोफत करण्यांत देण्यात येणार आहे.
हा उपक्रम खालापूर शहराध्यक्ष पद्माकर पाटील,नगराध्यक्ष रोशन मोडवे, व शिवसेना पदाधिकारी व सुरज हॉस्पिटल टीमचे डॉ.आर्यन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विजय देवरे,डॉ.शर्वरी शिंदे, डॉ.पंकज शिंदे, व हॉस्पिटलचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या महा आरोग्य शिबिराकरिता खालापूर नगरपंचायतचे गटनेते किशोर पवार, संपर्कप्रमुख दीपक पाटील, शहर संघटक पुंडलिक लोते, खालापूर समन्वयक हरेश मोडवे, शहर युवा सेना अधिकारी अमित जगताप, उपशहर प्रमुख राजू पार्ठे, रोहिदास मिरकुटे, यशवंत जाधव, वासुदेव पाटील तसेच नगरपंचायतच्या बांधकाम सभापती उज्वला ताई निधी, नगरसेविका मीनाताई वाघमारे, सुनिता पाटील, लताताई लोते, खालापूर प्राथमिक केंद्राच्या आशा सेविका नेहा गायकवाड, अंजली गायकवाड, संगीता गायकवाड, लीना पाटील, प्रियांका पान पाटील व धनंजय कदम शिवसेना पदाधिकारी हजर होते या शिबिरात खालापूर शहरासह वनवेवाडी, शिरवली वाडी दांडवाडी, महड निंबोडे उपस्थित होते.
तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खालापूर शहर शिवसेना युवा सेना पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
0 Comments